शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गडकरीच म्हणतात,काँग्रेस बळकट व्हायला हवी, जाणून घ्या राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:18 IST

‘लोकमत’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कारां’चा प्रदान सोहळा गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात झाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विरोधी पक्ष असेल, तरच लोकशाही टिकून राहील. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष असायला हवा. हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. त्यामुळे काँग्रेस बळकट व्हायलाच हवी, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘हिंमत हरली नाही, तर पराभवातही विजय असतो’, असा मंत्रही त्यांनी दिला.

‘लोकमत’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कारां’चा प्रदान सोहळा गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात झाला. यानंतर रंगलेल्या दिलखुलास मुलाखतीत गडकरी बोलत होते. लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांच्या थेट प्रश्नांना गडकरी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. लोकशाहीबद्दल काय वाटते? या विजय दर्डा यांच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले, विरोधी पक्ष असेल तर लोकशाही राहील. राजकारणात विचारांच्या आधारावर मतभिन्नता असते. पण आपण शत्रू नाही. वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. ती परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशी विचारधारा कधीच अपेक्षित नाही. सर्वांनी विचारधारेशी प्रामाणिक राहायला हवे. विचारभिन्नतेपेक्षा शून्यता ही खरी समस्या आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही

n महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, ज्या वेळी केंद्रात जाण्याची इच्छा नव्हती, त्यावेळी राष्ट्रीय राजकारणात गेलो. n आता तेथे सुखी आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. क्षमतेपेक्षा मला खूप चांगल्या संधी मिळाल्या. त्यानुसार मी काम करत राहिलो. मी महत्त्वाकांक्षी नेता नाही. मी ‘कनव्हिक्शन’ असणारा नेता आहे.

शेवटी मालक ते मालकच गडकरी यांच्याकडे पूर्वी असलेल्या गंगा शुद्धीकरण आणि जलवाहतूक या खात्यात झालेल्या बदलाचा संदर्भ देऊन गडकरी यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक ठिकाणी कुठला संपादक ठेवायचा हे जसे मालक ठरवतात, तसे आमच्याकडे मंत्रीपद हे पंतप्रधान ठरवितात. शेवटी मालक ते मालक असतात. कोणाला काढायचे, कोणाला ठेवायचे हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो.

भाजप-शिवसेनेचा पूल बांधणार का? या प्रश्नावर गडकरी म्हणाले, जे बांधायचे कॉन्ट्रॅक्ट असते तेच बांधायचे असते. मी फक्त नॅशनल हायवे बांधतो. महाराष्ट्राचे कंत्राट माझ्याकडे नाही.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरी