शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:19 IST

माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देमुख्य बाजारपेठेत आग दुकानदारांचे ७0 ते ८0 लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून,  दुकानांना लागूनच असलेल्या घरातील रोकड, दागिने, टीव्ही, फ्रीज या सार ख्या किमती वस्तू या आगीत भस्मसात झाल्याने येथील दुकानदारांचे मोठय़ा  प्रमाणात नुकसान झाले आहे.या वेळी हीना चिक्की मार्ट, निहाल एजन्सी, के.जी.एन. बेकरी, दिलावर बेकरी  या दुकानांची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला; परंतु कर्जत व  खोपोली येथील अग्निबंब वाहन मोठे असल्याने घाटातून वर आणण्यास श क्य नसल्याने तसेच वेळेत पोहोचू शकत नसल्याने, माथेरान नगरपरिषदेच्या  अग्निबंब गाडीच्या साहाय्याने पाणीपुरवठा केंद्र येथून तीन ते चार फेर्‍या  पाण्याच्या, तसेच शेजारील केतकर हॉटेलमालक प्रमोद नायक व मिस्टी  रीसॉर्टचे अल्ताफ शेख यांनी आपल्याकडील संपूर्ण पाणी आग  विझविण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच स्थानिक तरु ण व काही  लोक प्रतिनिधींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य केले. या  वेळी आग विझविण्यासाठी स्थानिक तरु ण सीताराम कुंभार, भास्कर शिंदे,  किरण चौधरी, कुलदीप जाधव, नासीर शारवान, माजी नगरसेवक प्रकाश सु तार तसेच इतर रहिवाशांनी आगीवर नियंत्रण आणले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,  नगरसेविका वर्षा रॉड्रिक्स, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गटनेते प्रसाद  सावंत यांनी धाव घेतली. या वेळी स्थानिक तरु णांनी आपल्या जीवाची परवा  न करता, आग आटोक्यात आणल्यामुळे या दुकानांना लागून असलेली दुसरी  दुकाने व घरे वाचली; परंतु या घटनेमुळे खान कुटुंबीय आपली राहते घर,  दुकाने जळल्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने माथेरान नगरपरिषद व  नागरिकांकडे व्यवसाय करण्यासाठी दुकाने व घरासाठी दया, याचना करत  सहकार्याची अपेक्षा करीत आहेत. या आगीचे अद्याप कारण समजले नसून स्थानिकांच्या मदतीने आगीवर  नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असून, माथेरानमध्ये या आ पत्तीजनक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाने, आपत्कालीन  कक्ष, ग्राम सुरक्षा दल, अग्निशमन दल कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :fireआग