शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीसाठी तैनात नऊपैकी चार स्पीडबोटी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:32 IST

रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात गस्तीसाठी तैनात असणाऱ्या नऊपैकी चार स्पीडबोटी बंद पडलेल्या आहेत.

- निखील म्हात्रेअलिबाग : रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात गस्तीसाठी तैनात असणाऱ्या नऊपैकी चार स्पीडबोटी बंद पडलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये स्पीडबोट दुरुस्तीची नसलेली सोय, कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता, अतिसंवेदनशील बंदरांवर नसलेली सुरक्षाव्यवस्था यामुळे जिल्ह्यात सागरीसुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येते. सागरीसुरक्षेकडे सरकार गंभीरतेने पाहत नसल्यानेच समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवताना रायगडपोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील बोटींची दुरु स्ती करण्यासाठी रत्नागिरीमध्ये कार्यशाळा उभारण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे. त्याला गती देण्याची गरज आहे.

समुद्रमार्गे अतिरेकी कारवाई होण्याची भीती सतत वर्तविण्यात येते. रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. १८ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पोलीसदल समुद्रातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवते. समुद्रात गस्त घालण्यासाठी नऊ स्पीडबोटी पोलीस दलाला देण्यात आल्या आहेत. मात्र, सद्यस्थितीत त्यामधील चार स्पीडबोटी या बंद पडल्या आहेत. त्याचप्रमाणे कुशल कर्मचाºयांची कमतरताही पोलिसांना भेडसावत आहे. खलाशी, सारंग, इंजिन ड्रायव्हर यांची कमतरता पोलिसांना सातत्याने भेडसावत आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या बोटींपैकी काही बोटी नेहमी बंदरांवरच नांगर टाकून उभ्या असल्याचे दिसून येते, तसेच या बोटी उभ्या करण्यासाठी पोलिसांकडे स्वत:चे बंदर नसल्याने बोटी नांगरून ठेवण्यातही अडचण निर्माण होत आहेत.

सागरी गस्तीसाठी जिल्ह्याला मिळालेल्या स्पीडबोटींच्या दुरु स्तीचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. या बोटींमध्ये काही बिघाड झाल्यास बोटींच्यादुरु स्तीचे काम मुंबई किंवा ठाणे शिपयार्ड या कंपन्यांतील ठेकेदारांना द्यावे लागते. त्यामुळे बोटींची दुरु स्ती करून ती पुन्हा पोलीस दलाकडे येण्यासाठी किमान महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागतो. या कालावधीत गस्तीवर फार मोठा विपरित परिणाम होते.

नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात रायगडमधील २० बंदरे अतिसंवेदनशील

नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील २० बंदरे अतिसंवेदनशील आढळली होती. या बंदरांवर सुरक्षारक्षकांसह पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. मत्स्य विकास विभागाने या कर्मचाºयांची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र, अद्यापपर्यंत ही नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिसंवेदनशील बंदरांवरील सुरक्षेचे तीन-तेरा वाजले आहेत.

जिल्ह्यात मांडवा, रेवस, जुनी आरसीएफ जेट्टी, थळ-नवगाव, अलिबाग मेन बिच, रेवदंडा पूल-१, रेवदंडा पूल-२, साळाव, नांदगाव, मुरुड खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी, शेखाडी, जीवनाबंदर, बागमांडला, मांदाड-१, दादर, आंबेत अशी विविध बंदरे अतिसंवेदनशील आहेत.

पोलिसांच्या ताफ्यात असणाºया चार स्पीडबोट नादुरुस्त असल्या तरी सागरी सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन ताब्यात असलेल्या चालू ५ स्टीडबोट तसेच खासगी टॉलर बोटीमार्फत आमचे जवान गस्त घालत आहेत. त्यामुळे सागरीसुरक्षेच्या बाबतीत तडजोड करण्यात आलेली नाही.-अनिल पारस्कर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक

पोलीस दलावर सुरक्षेची जबाबदारी दिलेली असली, तरी त्यांच्या ताफ्यात गस्तीसाठी असलेल्या स्पीडबोटी बंद पडल्या आहेत. दुरुस्तीची जिल्ह्यात सोय नसल्याने अडचण होत आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक मुख्यालयाच्या ठिकाणी दुरुस्तीची व्यवस्था असावी.-अ‍ॅड. राकेश पाटील, स्थानिक

सुरक्षेसाठी स्थानिकांची घेतली जातेय मदत

सागरी सुरक्षेवर लक्ष ठेण्यासाठी पोलीस दलातर्फे स्थानिकांची मदत घेतली जात आहे. विविध स्तरावर सागरी सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये मच्छीमार संस्थांचे सदस्य आणि पदाधिकाºयांसह स्थानिकांचा समावेश आहे. समुद्रात एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस दलासोबत संपर्क साधण्याचे आवाहन सातत्याने रायगड पोलिसांकडून करण्यातयेत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र