किल्ले रायगड पॅटर्न राज्यात राबविणार - रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:52 AM2018-01-19T03:52:41+5:302018-01-19T03:52:56+5:30

संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्रकिनाºयाइतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्रकिनाºयाची राखलेली स्वच्छता पाहून मला आनंद झाला आहे

The fort will be implemented in Raigad Pattern - Ramdas Kadam | किल्ले रायगड पॅटर्न राज्यात राबविणार - रामदास कदम

किल्ले रायगड पॅटर्न राज्यात राबविणार - रामदास कदम

Next

अलिबाग : संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्रकिनाºयाइतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्रकिनाºयाची राखलेली स्वच्छता पाहून मला आनंद झाला आहे, या स्वच्छतेबद्दल मी अलिबागकरांचे कौतुक करतो, अशा शब्दांत राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अलिबागकरांचे कौतुक केले. जिल्हा प्रशासनाने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यावर प्लॅस्टिकमुक्ती केली आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवून राज्यातील सर्व गड-किल्ले प्लॅस्टिकमुक्त करू, अशी घोषणाही कदम यांनी या वेळी केली. अलिबाग शहराच्या कचºयाची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नगरपालिकेला डम्पिंग ग्राउंड मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कदम यांनी दिले.
या वेळी आ. पाटील यांनी अलिबाग नगरपालिकेचा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. त्यावर कदम यांनी राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्लॅस्टिकबंदीचा कायदा होण्याआधीच जनतेचे प्रबोधन करून स्वयंस्फूर्तीने प्लॅस्टिकमुक्ती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अलिबागसाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्धतेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कदम यांनी उपस्थितांना दिले.

अभिनव उपक्र म राबवून रायगड किल्ला प्लॅस्टिकमुक्त केल्याबद्दल कदम यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कौतुक केले. रायगडप्रमाणेच राज्यातील अन्य किल्ल्यांवरही असाच उपक्र म राबवून राज्यातील सर्व गड-किल्ले हे प्लॅस्टिकमुक्त करण्याचा मनोदयही कदम यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

Web Title: The fort will be implemented in Raigad Pattern - Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.