शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

महाडमधील पुरामुळे अनेक संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:00 IST

महाड-पुणे मार्गावरील वरंधघाटामध्ये कोसळली दरड; वाहतूक ठप्प; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

बिरवाडी : महाड-पुणे मार्गावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने या ठिकाणांवरील वाहतूक मंगळवार, ६ आॅगस्टपासून ठप्प झाली आहे तर पुरामध्ये अडकलेल्या ७० कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथक व स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. घाटामध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आलेल्या महापुरामध्ये महाड एमआयडीसीमधील आसनपोई गावच्या हद्दीत लक्ष्मी आॅरगॅनिक कंपनीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने या कंपनीमधील महिला कामगारांसह ७० जणांना बचाव पथक पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली. वरंध घाटांमध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.बिरवाडी परिसरांमध्ये पुराचे पाणी ओसरले असून, बिरवाडीमधील बापटनगर, आदर्शनगर, कुंभारवाडा मोहल्ला या ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर वेरखोले येथील चंद्रकांत धोंडू तांबे यांचे घर कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा बिरवाडी तलाठी सज्जाचे तलाठी यांच्याकडून करण्यात आला आहे.

अनेक घरांचे नुकसानमुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामध्ये महाड एमआयडीसीमधील रस्ते, खरवली-बिरवाडी पूल, भावे पूल पाण्याखाली गेल्याची घटना २००५ नंतर प्रथमच घडली आहे, यामुळे जवळपास ८४ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.पाचाड, रायगडवाडीला फटकाकिल्ले रायगड परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पाचाड, रायगडवाडी, छत्री निजामपूर, पुनाडे, या गावातील घरे कोसळली आहेत. पाचाडमध्ये सात, रायगडवाडी १३, छत्री निजामपूर तीन, पुनाडेमध्ये दोन घरांचे नुकसान झाले आहे. पाचाड गावात राजेंद्र खातू, अनिल खातू, किसन भोसले, गोविंद भोसले, ललिता भोसले, लता मोरे, गोपाळ गायकवाड यांच्या घरांचा समावेश आहे तर रायगडवाडी गावातील गणपत साटम, पुनाडे गावातील जितेंद्र लामजे, मारुती कंक यांच्या घरांचे नुकसान झाले असून येथील तलाठी योगेश वार्डे यांनी पंचनामा केला आहे. कोसबी गावात जितेंद्र जाधव आणि त्यांचे भाऊ या दोघांच्या घरांचे नुकसान, सोलमकोंड येथील पांडुरंग सुतार, चोचिंदे गावातील भानुदास जाधव, रमेश मांडवकर, शांताराम भुवड, रुपवली गावातील प्रकाश शिर्के, विजय शिर्के, सीताबाई साळवी यांच्या घराचे नुकसान झाले. नडगावतर्फे बिरवाडी गावातील निर्मला मांडे, बिरवाडी वेरखोले येथील चंद्रकांत तांबे, मोहोप्रे येथील अनिल पवार यांचा जनावरांचा वाडा, तेलंगे गावातील मुक्ता मुकणे, दाभोळ गावातील बंडू रामा नाडकर यांच्या घरांची पडझड झाल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली.वरंध जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाड-पुणे रस्त्यावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून, या घटनेची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविण्यात आली आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याने या ठिकाणी दरड हटविण्याच्या कामास विलंब होत आहे. मंगळवार रात्रीपासून शेकडो प्रवासी या घाटामध्ये अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून दरड हटविल्याशिवाय प्रवासी पलीकडे येऊ शकत नाहीत. काही प्रवाशांनी घाटांमधील वाघजाई मंदिर परिसराचा आसरा घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरड कोसळलेल्या ठिकाणी जेसीबी पाठविण्यात आला नसल्याने बुधवार, ७ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत या ठिकाणी दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील शाखा अभियंता अमृत पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.शेतीचे नुकसानमहाड तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने १ आॅगस्टपासून मंगळवार, ६ आॅगस्टपर्यंत जवळपास ९३२ मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण पावसाची नोंद जवळपास ३००० मि.मी. इतकी झाली आहे. फक्त पाच दिवसांतच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने नद्यांना पूर आला होता. पूरपरिस्थितीत महाड तालुक्यात शेकडो एकर भात पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.महाड शहराला लागून असलेल्या सावित्री नदीकाठी असलेल्या महाड, गांधारपाले, मोहोप्रे, करंजखोल, गांधारी नदीकिनारील लाडवली, नाते, चापगाव, खर्डी या गावांसह बिरवाडी, नडगाव, कोल कोथेरी, राजेवाडी, कोंडिवते आदी गावांमधील भातशेतात गेल्या पाच दिवसांपासून पुराचे पाणी साचून राहिले होते.आमदार गोगावले यांनी के ली जेवणाची व्यवस्थाबिरवाडी : महाड शहरातील पूर ओसरल्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी मालबाजार पेठेतील नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त नागरिक व्यापाऱ्यांची विचारपूस केली. प्रांताधिकारी विठ्ठल नामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा करत पूरपरिस्थितीमधील बचाव कार्याची व नुकसानीची माहिती घेतली, तसेच पूरपरिस्थितीमध्ये महाड-पंढरपूर राज्यमार्गावरील भावे पुलावर पाणी आल्याने अडकलेल्या नागरिकांना आपल्या शिवनेरी येथील निवासस्थानी आणून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, तर अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाला रा.जि.प. सदस्या सुषमा गोगावले यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने सरकारी मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गोगावले म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊस