शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कुंडलिकेचे रौद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:05 AM

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे.

रोहा  - रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्यकक्षाने ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याची माहिती तहसीलदार सुरेश काशिद यांनी दिली आहे.रोह्यात शुक्र वारपासून पडणाऱ्या धुवाधार पावसाने शहरात हैदोस घातला आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह पीडब्ल्यूडी कार्यालय, दमखाडी आणि अष्टमी आदी भागात पाणी शिरले.प्रशासनाने दिवसभरात वेळोवेळी भोंगे वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.भिरा व कोलाड येथील डोलवहाल धरणातून पाणी सोडण्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारपासून रोहा अष्टमी पुलाला लागून पाणी वाहू लागले. सायंकाळपर्यंत पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पुराचे पाणी गावात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.धरणातून पाणी सोडल्यास त्याचा फटका नदीच्या दोन्ही बाजूकडील रोहा अष्टमी शहर आणि लगतच्या गावांना बसणार आहे. रोहा तालुक्यात सतत पाऊस पडत असून नदी, नाले तुडुंब भरले आहेत. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता, तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पावसामुळे काही भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. शेतीच्या बांधांना खांडी गेल्याने पावसाचे पुराचे पाणी शेतात घुसत आहे, तर काही गावांतील घरामध्ये देखील पाणी शिरले आहे.नद्यांनी धोक्याचीपातळी ओलांडलीमुसळधार पडत असणाºया पावसामुळे तालुक्यातील कुंडलिका, गंगा, मैसदरा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे रोहा अष्टमीप्रमाणे काही नदीकिनारील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. शहरात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. कुंडलिका तुडुंब भरून वाहत असल्याने दमखाडी मागील परिसरातदेखील पुराचे पाणी शिरले आहे.येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तरी प्रशासन पूर्णत: दक्ष असून महसूल विभागासह पूर नियंत्रण कक्ष सर्वत्र संपर्क ठेवून आहे.२००५ च्या पुराचा अनुभव पाहून प्रत्येक ठिकाणी सहायता गट कार्यरत आहेत, तसेच शासनाचे सर्व विभाग संयुक्तपणे काम करत आहेत.- सुरेश काशिद,तहसीलदार, रोहा

टॅग्स :floodपूरRaigadरायगड