शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रायगडमधील सर्व बीचेसवर समुद्रात फ्लोटिंग बोयाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 18:21 IST

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून उपक्रम

- जयंत धुळप

अलिबाग: पर्यटकांना समुद्रात पोहताना सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर फ्लोटींग बोयाज बसवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशिद या दोन बीचेसवर बोयाज बसवण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ५ लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटक सुरक्षा व्यवस्था अंतर्गत बीचवर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांडवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई या सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर हे बोयाज लावण्याचं काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली.समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शवण्यासाठी तसंच धोकादायक पातळी दर्शवण्यासाठी फ्लोटिंग बोयाजचा वापर होतो. समुद्र किनाऱ्याच्या काठापासून साधारणतः ५० ते ६० मीटर अंतरावर किंवा भरती ओहटीच्या पातळ्यांचा अभ्यास करुन व स्थानिकांच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणं निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचं काम सध्या सुरु असल्याचं पाठक यांनी पुढे सांगितलं. जिल्ह्यात एकूण ११५ बोयाज बसवण्यात येत आहेत.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा उपयुक्त उपक्रम असून यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनानं पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्यानं साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये. आपली स्वत:ची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावं. प्रशासनानं प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सूचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 

टॅग्स :Raigadरायगड