शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

महाडमधील पाच गावांना भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 17, 2016 01:16 IST

महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडजवळच असणाऱ्या कोतुर्डे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली, वहूर आणि दासगांव

- सिकंदर अनवारे,  दासगावमहाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडजवळच असणाऱ्या कोतुर्डे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली, वहूर आणि दासगांव या ५ गावांना सध्या पाणीटंचाईची मोठी झळ बसली होती. गेल्या पाच वर्षांपासून कोतुर्डे धरणाची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असून, गेल्या वर्षी याच धरणाला मोठे भगदाड पडले होते. त्या ठिकाणाहून या पाच गावांसाठी सोडण्यात येणारे पाणी या पाच गावांची जॅकवेल जवळपास या धरणापासून २० किमी एवढ्या अंतरावर असल्याने हे धरणाचे सोडलेले पाणी गेल्या १५ दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. सध्याच्या या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, या पाचही गावांमधून अद्याप एकाही ग्रामपंचायतीने गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी महाड संघटना खिलारे यांनी दिली आहे. मात्र पाणीपुरवठ्यासाठी टँकरद्वारे मागणी करूनही पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.महाड तालुक्यातील या पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना रायगडच्या जवळच असलेल्या कोतुर्डे धरणातूनच होत आहे. गेल्या वर्षी धरणाला भगदाड पडून गळती लागली होती. मात्र त्या वेळी त्या धरणाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून एप्रिल महिन्यातच या धरणापासून या पाच गावांना मिळणारे पाणी बंद होते. पंचायत समिती महाड यांच्यामार्फत या पाचही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाच गावांतील जवळपास २५ वाड्यांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली आहे. करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली आणि वहूर या गावांना विहिरींची संख्या कमी असून, त्याही विहिरींचे पाणी संपत आले आहे. दासगांवमध्ये काही विहिरी कोरड्या झाल्या आहेत, तर काही विहिरींचे पाणी औद्योगिक वसाहतींच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. परिणामी पाचही गावांची सध्याची पाण्याची परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून बिकट आहे व येत्या पावसाळ्यापर्यंत परिस्थिती बिकट राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.