हिराकोटमधील माशांना मिळणार जीवदान

By निखिल म्हात्रे | Published: January 6, 2024 12:46 PM2024-01-06T12:46:30+5:302024-01-06T12:47:42+5:30

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली.

fish in hirakot will get life | हिराकोटमधील माशांना मिळणार जीवदान

हिराकोटमधील माशांना मिळणार जीवदान

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या हिरकोट तलावातील माशांचे संवर्धन केले जाणार आहे. माशांना बाहेरून देण्यात येणारे खाद्य पुर्णपणे थांबविण्यात यावे अशा सुचना मस्त्य विभागाने अलिबाग नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत.
दे मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त संजय पाटील यांनी अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना याबाबतचे पत्रच सादर केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली असता सदर पाहणी दरम्यान तळयातील पाण्याचे विविध गुणधम पासण्यात आले. तसेच मेलेल्या तिलापिया माश्याचे नमुने घेण्यात आले की, पाण्याचा रंग हा हरवा झालेला असून पाण्यामध्ये वनस्पती प्लवंगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी झालेले आहे. एकंदरीत पाण्याचा दर्जा बिघडत असल्याचे जाणवते. मरतुक झालेल्या तिलापिया माश्यांना आजार झाल्याचे दिसून आलेले आहेत. तसेच माशांच्या कल्ल्यांचे निरीक्षण केले असता पाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये विरघळलेला प्राणवायू असल्याचे जाणवत आहे.

अशी परिस्थिती पाहता, पाण्यामधील प्राणवायूची मागणी कमी करण्यासाठी पाण्यामध्ये असलेलाा मत्स्यसाठा ५०% कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सद्यस्थितीत पाण्यात असलेला प्राणवायू उर्वरीत माशांना पुरेसा ठरून माशांचे मृत्यू होण्याचे प्रमाण थांबेल असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे. मृत्यूमुखी पडलेले मासे होणारे मासे तात्काळ काढून टाकण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळाची तरतूद केले जावी. जेणेकरून त्यांच्या कुजण्याच्या क्रियेमुळे तलावातील पाणी दर्जाहीन होणार नाही व इतर माशांना होणारा संसर्ग कमी करता येईल. लोक त्यांच्या घरातील शोभेच्या माशांच्या टाक्यांमधील मासे तलावात सोडत असावेत, यास देखिल अटकाव करावा, असेही मत्स्य विभागाच्या पत्रात नमूद केलेले आहे.

बाहेरचे खाद्य बंद करा -

माशांना बाहेरून देण्यात येत असलेले खाद्य देणे तात्काळ थांबवावे. पाण्याचा हिरवा रंग जाण्यासाठी तातडीची उपाय म्हणून सकाळी ९ वाजता १०० लीटर ताजे गोडे पाणी एका बॅलरमध्ये (२०० लि.) घ्यावे त्यात १० घस साखर १० घस तांदळाचे पीठ मिस्क करावे. त्यानंतर ३ ते ४ तासोनो काठीने हलवावे.  ४८ तासांनी हे द्रावण तळावात सगळीकडे फिरुन टाकावे. भविष्यात तळावातील पाण्याचा, मातीचा दर्जा चांगला राहावा यासाठी हे द्रावण नियमीतपणे वापरणे उपयुक्त होईल, अशी सुचनाही करण्यात आली.

Web Title: fish in hirakot will get life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग