शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 19:15 IST

अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते.

कार्लेखिंड- अलिबाग तालुक्यातील जलपाडा येथील अनंत फायर वर्क्स  या फटाका कारखान्याच्या गोडाऊनला आग दुपारी लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी अलिबाग नगर परिषदेसह आरसीएफ कंपनीचे अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये गा़ेडावूनचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. फटाके तयार करताना त्यामध्ये बेरियम हा घटक वापरण्यात येत असल्याच्या कारणाने दिवाळीमध्ये पाेलिसांनी या कारखान्यावर कारवाई केली हाेती. पाेलिसांनी सदरचा माल जप्त करुन अनंत फायर वर्क्सच्या गाेडाऊनमध्येच ठेवला हाेता, अशी माहिती अनंत फायर वर्क्सचे मालक अनंत शिंदे यांनी लाेकमतला दिली.

आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक गाेडाऊनला आग लागली. त्यामुळे तातडीने अग्नीशमन दलाला बाेलावण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. अलिबाग नगर परिषदेचे दाेन आणि आरसीएफ कंपनीच्या एक अशा तीन अग्नीशमन बंबाने अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कारखाना बंद असल्याने कामगार नव्हते. तसेच गाेडाऊनच्या आसपासही काेणी नसल्याने काेणालाही धाेका पाेचला नाही, मात्र मालासह गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.  

टॅग्स :fireआगRaigadरायगड