शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तळोजा एमआयडीसीत आगीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:21 IST

मोकळ्या जागेवर बेकायदा डम्पिंग; दोन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात

पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. पडघे गावाजवळील कासाडी नदीच्या किनाऱ्यालगत मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या रासायनिक कचºयाला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. सुमारे दोन तास ही आग सुरूच होती. अखेर अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.संबंधित रासायनिक व केमिकल मिश्रित कचरा अनेक दिवसांपासून नोव्होटर इलेक्ट्रिक व डिजिटल सिस्टीम प्रा. लिमिटेड या दोन कारखान्यांना लागून असलेल्या मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आला होता. यासंदर्भात तळोजा विभागातील काँग्रेसचे पर्यावरण सेलचे सुनील भोईर यांनी पनवेल महानगरपालिका व एमपीसीबीला लेखी तक्रारही केली होती.

तळोजा एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांच्या मार्फत अनधिकृत हा कचरा येथील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. नजीकच्या काळात हा प्रकार सर्रास वाढला असल्याचे भोईर यांनी सांगितले. मात्र, या प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे अखेर या ठिकाणी आग लागलीच.आग लागल्यानंतर दोन तास मोठ्या प्रमाणात आगीचा भडका झाल्याने या भूखंडालगत असलेल्या कारखान्यांनाही आगीचा धोका निर्माण झाला होता. मात्र, तळोजा एमआयडीसीमधील अग्निशमन दलातील पाच कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले.संबंधित आगीचा भडका झाल्यानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केली होती. तळोजा एमआयडीसीमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याला एमआयडीसी वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. काही घटनांना तांत्रिक कारण असते, तर काही घटना या स्वत: आगीला निमंत्रण दिल्यासारख्या असतात. आजची घटना ही धोकादायक रासायनिक कचरा उघड्यावर डम्प केल्याने घडली आहे.रासायनिक कचरा टाकणाºया कारखान्यांवर कारवाईची मागणीआग लागलेल्या मोकळ्या भूखंडावर रासायनिक कचरा कशाप्रकारे आला? अशाप्रकारे धोकादायक पद्धतीने उघड्यावर टाकलेल्या या रासायनिक कचºयाला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? या भूखंडावर पडलेल्या कचºयाचे नमुने घेऊन यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेस पर्यावरण सेलचे सुनील भोईर यांनी केली.