शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोरगिरी येथील घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:40 IST

तालुक्यातील मोरगिरी येथील लग्नकार्यासाठी बाहेर गेलेले प्रकाश शिंदे यांच्या घराला रविवारी सकाळी १० ते १०.२० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या वेळी रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले.

पोलादपूर : तालुक्यातील मोरगिरी येथील लग्नकार्यासाठी बाहेर गेलेले प्रकाश शिंदे यांच्या घराला रविवारी सकाळी १० ते १०.२० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या वेळी रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत घराची भिंत व दरवाजा तोडून सिलिंडर बाहेर काढून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा अथक प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर महाड येथील अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर आग पूर्ण विझली असली तरी लाखोरु पयांचे नुकसान झाले आहे.प्रकाश गोविंद शिंदे (रा. मोरगिरी) हे शेतीचा व्यवसाय करत असून ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी काटेतळी येथे लग्नकार्याला गेले असता घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज असून या आगीत ४० हजारांची रोकड व साडेतीन ते चार तोळ्यांचे दागिने असा ऐवज व संपूर्ण लाकडी साहित्य जळून खाक झाले. त्याचप्रमाणे घरातील तांब्या, पितळेची व स्टील भांड्यांचे नुकसान झाले आहे.आग लागल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी प्रथम घराची भिंत व दरवाजा तोडून घरातील सिलिंडर बाहेर काढून मिळेल त्या साहित्याने पाण्याचा मारा केला. मात्र, लाकडी वासे व कौलारू घर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाड येथील अग्निशमनच्या बंबाची प्रतीक्षा करावी लागली. २२ किमीचा रस्ता कापत अग्निशमनची गाडी सुमारे अर्ध्या तासानंतर घटनास्थळी आली असता आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत घरातील कपडे, लाकडी कपाट, शोकेससह तांदुळाची पोटी, आदीसह विद्युत साहित्य जळून खाक झाले. आगीचे वृत्त कळताच पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :fireआग