शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:02 IST

दुर्घटनेत बचाव कार्यासाठी जात असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

इर्शाळवाडी : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दुर्घटनेत बचाव कार्यासाठी जात असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यु करण्यासाठी जात असताना नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी येथील अग्निशमन दलाचे सहायक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. इर्शाळवाडीत जाण्यासाठी कठीण मार्ग असल्याने रक्तदाब वाढून शिवराम ढुमणेसोबत ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे पथक व स्वच्छता विभागाचे कर्मचारी घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.

याचबरोबर, इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावासाठी एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे इर्शाळगडाच्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले होते. 

२७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRaigadरायगडlandslidesभूस्खलन