शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

नाढळ पाझर तलावात मातीचा भराव!

By admin | Updated: March 14, 2016 01:54 IST

राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नाढळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नाढळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या या पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर या भागात मुंबईतील धनिकांची फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच जमिनींना सोन्याचा भाव आल्याने स्थानिक दलालांना हाताशी धरून मोक्याच्या आणि जलसाठ्यालगतच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या घटना घडत आहेत. खालापूर तालुक्याच्या लोधिवली ग्रामपंचायतीच्या नाढळ गावाच्या हद्दीत जवळपास ४० एकरांचा नाढळ पाझर तलाव आहे. अलीकडे या तलावाच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषदेने कोट्यवधी रु पये खर्च केले असून, या तलावाच्या मागील बाजूस तलावालगत असणाऱ्या मुंबईतील धनिकांनी तलावात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दगडमातीचा भराव केल्याने तलावाचे पाणी साठवणुकीचे क्षेत्र अंदाजे चार एकर कमी करण्यात आले आहे. पुन्हा एकदा हे काम रात्रंदिवस सुरू केल्याचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तर ग्रामसेवक यांच्या पाहणी करताना लक्षात आले. या तलावाच्या पाण्यावर सहा ते सात गाव-वाड्यांच्या परिसरातील पाणी योजना आहेत. शेतकरीवर्ग तर आदिवासी बांधव असल्याने ही गंभीर बाब ग्रामपंचायतीने तत्काळ तहसीलदारांच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी सरपंच गंगू कातकरी, उपसरपंच गणपत ठाकू, सदस्य सुभाष प्रबलकर, किशोर निकाळजे, ग्रामस्थ मधुकर पारधी, रवींद्र भुईकोट, ग्रामसेविका रश्मी शिंदे आदी उपस्थित होते. जेसीबी, फोकलेन मशिन, डम्परच्या साहाय्याने मातीचे उत्खनन करून उत्खनन केलेल्या मातीचा भराव थेट तलावाच्या पाण्यात टाकण्यात येत असल्याच्या या प्रकारावर ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जवळील डोंगरही पोखरण्यात आले आहेत. या घटनेची तक्र ार पंचायतीने तहसीलदार, लघु पाटबंधारे कार्यालय कर्जत यांच्याकडे केली आहे.