शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Fathers Day: बाप राबतोय शेतात अन् अ‍ॅन्ड्रॉइड फोन पोरांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:51 IST

ग्रामीण भागातील विदारक सत्य; मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल

- शरद निकुंभ पाली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा खूश झाला असून, ग्रामीण भागात पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आपल्या वडिलांची धावपळ सुरू असताना तरुण पोरं मात्र मोबाइल हातात धरून तासन्तास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि मनोरंजन करण्यात गुंग असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. गुड मॉर्निंग, गुड नाइटचे संदेश, दिवसभरात वाढदिवसांच्या शुभेच्छा, टीकात्मक लेख, टिकटॉकच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी वडिलांना शेतीच्या कामात मदत गेल्यास मजुरांवर होणारा खर्च वाचेल, शिवाय उत्पादनातही वाढ होईल, अशी भावना सध्या ग्रामीण भागातील चिंतातून बळीराजाकडून व्यक्त होत आहे.सध्या शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे, त्यामुळे अधिक मजुरी द्यावी लागत आहे. अशा स्थितीत घरातील तरुण पोरगा मात्र आपल्या वडिलांना शेतात हातभार लावायचा सोडून निरर्थक कामात आपला वेळ वाया घालवत आहे. शेतातील कामाची आजच्या तरुणांना लाज वाटत असल्याचे चित्र अनेक कुटुंबांत पाहायला मिळत आहे. मदर डे आणि फादर डे च्या शुभेच्छा फक्त मोबाइलवर देऊन कृती मात्र शून्य असते. आईवडिलांची घरकामात, शेतीच्या कामात मदत करण्यापेक्षा सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालविण्यात ही पिढी धन्यता मानत आहे.आजचा तरुणवर्ग मोबाइलच्या फेºयात गुरफटला आहे. त्यामुळे शेतीच्या कामात मदत करायला तयार नाही. शेतकरी असून शेतीच्या कामांची त्याला पुरेशी माहिती नाही. पुढील पिढी शेतीचे काम करेल, असा प्रश्न पालकांना पडतो. शिक्षणाबरोबरच शेतीचे शिक्षणही तरुण पिढीने घेणे, काळाची गरज आहे.- किसन उमटे,शेतकरी, कानसळवडिलांनी शेती तरुण पिढीने टिकवणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर तासन्तास वेळ वाया घालविण्यात धन्यता मानणारी ही पिढी वडिलांच्या कष्टाला कशी न्याय देणार? शिक्षण झाले तरी नोकरी नाही आणि शेतीचे काम येत नाही तर पुढे ही मंडळी काय करणार असा प्रश्न आहे?- राजेश गोळे,सामाजिक कार्यकर्ते, पेडली

टॅग्स :Farmerशेतकरी