शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सहा नगर पंचायतींच्या ७९ जागांसाठी ७४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 00:36 IST

सहा नगर पंचायतींमधील ७९ जागांसाठी ८२ मतदान केंद्रावर मतदानाला मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. त्यानुसार मतदार राजामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला.

रायगड- जिल्ह्यातील तळा, खालापूर, म्हसळा, माणगाव, पोलादपूर आणि पाली (नवनिर्मित) या सहा नगर पंचायतीच्या (Nagar Panchayat) ७९ जागांसाठी ७४.२० टक्के मतदान झाले. २३३ उमेदवारांचे भवितव्य निवडणूक यंत्रामध्ये मंगळवारी मतदार राजाने बंद केले. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीमध्ये कोठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

सहा नगर पंचायतींमधील ७९ जागांसाठी ८२ मतदान केंद्रावर मतदानाला मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. त्यानुसार मतदार राजामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला. काही मतदार काम-धंद्यानिमित्त मुंबई, ठाणे या ठिकाणी राहतात. मात्र मतदानासाठी ते न चुकता गावामध्ये येतात. अशा मतदारांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदार केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांच्या घरी जाऊन मतदानाला येण्यासाठी विनंती करत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीची लगबग सुरू होती. वयोवृद्धांनी कुटूंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

दुपारनंतर मतदारांची संख्या रोडावली - सकाळी साडेसात ते साडेअकरा या कालावधीत सहा नगर पंचायतीमध्ये ३३.६६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर उन्हाचा कडाका असल्याने मतदानासाठी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडला नाही. दुपारी दीड वाजेपर्यंत ५२.९ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतरही मतदानासाठी येणाऱ्याची संख्या रोडावली होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६८.५३ टक्के मतदारांनी मतदान केले. महिलांसह वयोवृद्धाही मतदान करण्यासाठी पुढे आल्याचे दिसून आले.

खालापूर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक मतदान -सहा नगर पंचायतींसाठी ७४.२० टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये खालापूर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक मतदान झाले. खालापूर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक ८४.४६टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्या खोलाखाल तळा ७३.८२ टक्के, पोलादपूर ७१.९२ टक्के आणि माणगाव ७०.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. म्हसळा ६८.५० टक्के मतदान झाले. नवनिर्मित झालेला पाली नगर पंचायतीमध्ये प्रथमच मतदान होत आहे. या ठिकाणी ७८.६६ टक्के मतदारांनी मतदान केले.

पाली नगरपंचायतीसाठी प्रथमच मतदान -पाली नगर पंचायत नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानासाठी चांगलीच उत्सुकता होती. पालीमधील मतदारांनी १३ उमेदवारांसाठी मतदान केले. पालीमध्ये ७८.६६ टक्के मतदान झाले. ४७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

उमेदवारांची धाकधूक कायम -ओबीसी आरक्षणाच्या २१ जागा या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारी २०२१ रोजी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक कायम राहणार आहे.

पंधरा दिवसांपासून प्रचाराचा धुरळा - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांनी आपपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नगर पंचायतीवर आपल्याच राजकीय पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी सर्वांनी गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलीच कंबर कसली होती. प्रत्यक्षात मतदान पार पडले आहे. मतदाराजा कोणाच्या पारड्यामध्ये कौल देणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

सहा नगरपंचायतींसाठी मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तक्रारी आल्या होत्या, मात्र कोठेही गडबड गोंधळ झाला नाही, असे  उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक