शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

फार्महाउस मालकाने बंद केली धोत्रेवाडीची विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:57 IST

झाडांना वापर : पाणी देण्याची आदिवासी बांधवांची मागणी

- कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरीपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खासगी जमीन मालकाने आपल्या फार्महाउसमध्ये कुंपणबंद केली आहे. शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाउस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत. मात्र, त्या वेळी बाजूच्या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील उन्हाळ्याने पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांची वणवण वाढली आहे. तालुक्यातील तब्बल ३९ गावे आणि ५७ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. असे असताना पाथरज ग्रामपंचायतीमधील धोत्रेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी लोकांना वणवण करावी लागत आहे. आदिवासी विकास विभागाने त्या वाडीसाठी दोन विहिरी खोदून दिल्या आहेत, त्यातील एका विहिरीने तळ गाठला असून दुसरी विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे. मात्र, ती विहीर शेतकरी असलेल्या खासगी व्यक्तीच्या जागेत खोदल्यानंतर ही जमीन नवी मुंबई येथील व्यक्तीने खरेदी केली आणि सरकारी निधीमधून खोदण्यात आलेली विहीर त्या नवीन जमीन मालकाची झाली. मात्र, त्या आधी ती विहिरी धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांसाठी पिण्याचे पाणी देत होती. ती विहीर संबंधित जमिनीचे मालक नवीन झाल्याने विहीर कुंपणात गेली. नवी मुंबईमधील त्या जमीन मालकाने आपल्या जमिनीला कुंपण घातल्याने आणि आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यास विरोध केल्याने धोत्रेवाडीमधील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांनी त्या जमीन मालकाविरु द्ध गतवर्षी जोरदार आवाज उठविल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने विहिरीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मे २०१८ मध्ये तहसीलदारांनी पाठ फिरली आणि पुन्हा त्या फार्म हाउस मालकाने आपल्या जमिनीतील विहिरीजवळ येण्याचा मार्ग बंद केला.

यावर्षी धोत्रेवाडीमध्ये पुन्हा एकदा पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली असून शासनाच्या निधीमधून बांधलेली विहीर फार्म हाउस मालकाने कुंपण घालून बंद केली आहे. हा जमीन मालक शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी वीज पंप लावून आपल्या फार्महाउसमधील झाडांना टाकत आहे.त्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले असून त्यांनी शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश काळात पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही अडवू शकत नाही. या काळात झाडांपेक्षा मनुष्यप्राणी महत्त्वाचा समजला जातो, त्यामुळे तक्र ारी प्राप्त होताच विहिरीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही केली जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतधोत्रेवाडीमधील विहिरीत भरपूर पाणी असून देखील आमच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे.आम्हाला आमच्या विहिरीचे पाणी हवे आहे.- जयवंती हिंदोळा,ग्रामस्थ

टॅग्स :water shortageपाणीटंचाई