शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बारणे गावातील शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:03 IST

तालुक्यातील बारणे गावातील एका तरु ण शेतक-याने शेतीमधील नुकसानीबद्दल विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मालकीची जमीन नसलेल्या त्या शेतक-याने दुस-याची शेती भाड्याने घेऊन शेती केली होती.

कर्जत : तालुक्यातील बारणे गावातील एका तरु ण शेतक-याने शेतीमधील नुकसानीबद्दल विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मालकीची जमीन नसलेल्या त्या शेतक-याने दुस-याची शेती भाड्याने घेऊन शेती केली होती. मात्र, अवेळी पावसाने त्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर त्या शेतकºयाच्या डोक्यावर होता.बारणे गावातील शेतकरी चंद्रकांत गणू ठोंबरे हे दिवसा मोलमजुरी आणि रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. ३८ वर्षीय ठोंबरे यांच्या कुटुंबाकडे जमीन नसल्याने त्यांनी शेतीतून खायचे तांदूळ पिकविण्याचा निर्णय घेतला आणि गावातील एका शेतकºयाची दोन एकर जमीन भाड्याने घेऊन भाताची शेती करण्याचा निर्णय घेतला. जून २०१७ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने भाताची शेती केली. शेती करण्यासाठी जमीन भाड्याने घेताना बियाणे, खते हे कर्ज काढून आणले होते. त्या वेळी जमिनीतून भाताचे उत्पादन झाल्यानंतर लोकांकडून घेतलेले कर्ज फेडू, असा विश्वास चंद्रकांत ठोंबरे यांना होता. रात्री कर्जत तालुक्यातील कुशिवली येथे असलेल्या कॉलेजमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारे चंद्रकांत हे दिवसा शेतात काम करायचे. दिवाळी सणाच्या दरम्यान सर्वत्र अवेळी पाऊस झाला होता. वादळी वाºयासह सतत आठवडाभर आलेल्या पावसामुळे चंद्रकांत ठोंबरे यांनी लावलेल्या शेतात उभे असलेले भाताचे पीक कोसळले होते. त्या भागातील जमीन पाण्याची असल्याने शेतात साचून राहिलेले पाणी अनेक दिवस तसेच राहिले आणि भाड्याने जमीन घेऊन केलेल्या भाताच्या शेतातील पीक हे शेतातच कुजून गेल्याने ठोंबरे कुटुंबाचे नुकसान होऊन चंद्रकांत ठोंबरे हे कर्जाच्या फेºयात अडकले. याच तणावात १ डिसेंबर रोजी सकाळी घरातून काहीही न सांगता घराबाहेर पडलेला चंद्रकांत दुपार झाली तरी घरी आला नाही, म्हणून वडील,पत्नी, मुलगा आणि भाऊ हे शोध सुरू के ला असता शेतात विषारी औषध प्राशन के ल्याचेलक्षात आले.ग्रामस्थांच्या मदतीने या शेतकºयाला कर्जत येथे दवाखान्यात नेले. मात्र, दुपारी अडीच वाजता या शेतकºयाचा मृत्यू झाल्याचे डॉ. साबणे यांनी जाहीर केले. अशा प्रकारे शेतीत झालेले नुकसान यामुळे बारणे गावातील तरु ण शेतकºयाला आत्महत्या करण्याची वेळ आली.

टॅग्स :Farmerशेतकरी