शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

महामार्गबाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; केंद्राचा निधी अपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:00 IST

सव्वाशे शेतकऱ्यांना ६८ कोटींचे वाटप शिल्लक

- सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहेत. या कामात महाड आणि पोलादपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे बाधित झाली आहेत. केंद्र सरकारकडून वाटपासाठी अपुरा निधी आल्याने आजही शेकडो शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी नागरिक महाड येथील प्रांत कार्यालयात फेºया मारत आहेत.मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गेली दोन वर्षांपासून सुरवात झाली आहे. केंद्र सरकारकडून चौपदरीकरणात बाधित होणाºया जमिनीचे तसेच बांधकामांचे सर्व्हे करत त्यांचे भूसंपादन देखील करण्यात आले. संपादित करताना संबंधित खात्याकडून अनेक चुका करण्यात आल्या. याचा फटका मात्र बाधित नागरिकांना बसला. तक्रारीनंतर पुन्हा काही ठिकाणच्या तपासण्या करण्यात आल्या. यामुळे अनेक नागरिकांच्या जमिनी तसेच बांधकामे बाधित होत असल्याचे निष्पन्न झाले. पुन्हा या सर्व्हेचा अहवाल तयार करून मोबदला देण्याची तयारी सरकारने दर्शवली. मात्र या नागरिकांना सरकारकडून एकही रुपया मिळाला नसून पैशासाठी वारंवार महाड प्रांत कार्यालयाचा फेºया मारल्या जात आहेत.महाड आणि पोलादपूर तालुक्यात एकूण साडेचार हजार शेतकरी चौपदरीकरणाच्या कामामुळे बाधित होत आहेत. केंद्र सरकारकडून मोबदल्यापोटी साडेचारशे कोटी इतकी रक्कम अपेक्षित असताना ३८२ कोटी रक्कम महाड महसूलकडे आली आहे. या सर्व पैशाचे वाटप होऊन फक्त २२ लाख रुपये शिल्लक आहे. आजही १२५ शेतकºयांना मोबदला वाटप होणे गरजेचे असले तरी यासाठी ६८ कोटी रक्कम येणे अपेक्षित आहे.चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे जरी काम जोराने सुरू असले तरी पैसा न मिळालेले शेतकरी ठेकेदाराला आपल्या जमिनीत काम करू देत नसल्याने आजही अशा ठिकाणी काम बंद आहे. अशा परिस्थितीत दुसºया टप्प्यातील चौपदरीकरण काम पुढील दोन वर्षात तरी मार्गी लागेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रांत कार्यालयाकडून सव्वाशे शेतकºयांचा अहवाल दोन वेळा महामार्ग विभागाला पाठवण्यात आला आहे. ज्या जमीन बाधितांना मोबदला मिळालेला नाही, ते ठेकेदाराला काम करण्यास अडवत आहेत. या लोकांची समजूत काढण्यात येत आहे. निवाड्याची रक्कम प्राप्त होताच संबंधितांना मोबदला अदा करण्यात येईल.- विठ्ठल इनामदार,प्रांत अधिकारी,महाड