शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:52 IST

उत्पादन खर्चही निघेना : तालुक्यातील २८४०.६६ हेक्टर क्षेत्र बाधित

- दत्ता म्हात्रे 

पेण : अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील १४० गावांमधील ९,४९६ खातेदार शेतकऱ्यांच्या २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे उत्पादन मातीमोल ठरले आहे. तब्बल सात हजार १०२ एकर भातशेतीला अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठविला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ७९ हजार १३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल एक हजार ८१६ गावांमधील ७१ हजार १३ खातेदार शेतकºयांचे १८ कोटी, १० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी आयुक्तांकडे अहवालातून पाठविण्यात आली आहे. शेष राहिलेल्या भातपीक उत्पादनात उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकºयांचा एकरी १८ हजार ते १९ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. तर हातात जेमतेम तीन ते चार हजार रुपये पडणार असल्याचे झोडणी केलेल्या भातपीक उतारावरून दिसत आहे. खरिपाचे पीक हातातून गेल्याने वर्षभर मजुरी करून शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागणार आहे.

पेण तालुक्यातील आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येऊन भातशेतीला पावसाचा पहिला तडाखा बसला होता. पेणच्या पश्चिमेला असलेली खारभूमी शेती पुराने पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर इकडून तिकडून रोपे गोळा करून लागवड केलेली भातशेती आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेली आहे. शासकीय पंचनामे पूर्ण करून जाहीर झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत पेणची १४० गावातील ९,४९६ खातेदार शेतकºयांची २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती नष्ट झाली आहे. आर्थिक नुकसानीची आकडेवारी एक कोटी ९३ लाख १६ हजार रुपये सरकारी अहवालात नमूद करण्यात आली आहे.

यंदा खरीपातील उत्पन्नाचा हिशोब द्यावयाचा झाल्यास ‘आमदानी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा आहे. एक एकरी भातशेती उत्पादन खर्च १८ ते १९ हजार रुपये इतका खर्च होतो. सरासरी अडीच ते तीनपट उत्पादन घेतले जाते. २१ ते २२ क्विंटल एकरी भातशेतीतून भाताचे उत्पादन घेतले जाते. एकरी ५५ ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, यंदा एकरी जेमतेम तीन ते चार क्विंटल इतकेच हाती उत्पन्न मिळत असल्याने केलेला खर्च भरून निघणार नाही.

शेती उत्पादनाचा एकरी खर्च
एक एकर शेतीला टॅक्टरद्वारे जमीन उखळणीसाठी १००० रुपये, भातपीक वाफे (राब) तयार करणे १५००, शेताचे बांध मजबुती करणे १५००, बी-बियाणे १२००, खते व कीटकनाशके २५००, तण काढणे १००० रुपये, लागवड ३०००, कापणी ३५००, बांधणी १०००, झोडणी ३०००, असे एकूण १८ ते १९ हजार एकरी खर्च येतो. मात्र, खरिपाच्या उत्पन्नाची बेगमी करून जर हातात जेमतेम पडणार असल्याने अवकाळीने खरीप हंगामाची धूळधाण उडविली आहे.