शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:03 IST

एसटीसाठी ई-पासची आवश्यकता नाही; सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक

रोहा : कोकणात आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता मुंबई, बोरीवली, नालासोपारा व ठाणे या मार्गावर शुक्रवार २८ आॅगस्ट ते रविवारी ३० आॅगस्ट या कालावधीत रायगड परिवहनच्या रोहा आगारामार्फत एस.टी. बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी दिली.चाकरमान्यांसाठी काही मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये रोहा आगारातून रोहा ते बोरीवली ही गाडी सकाळी १० व दुपारी २ वाजता सोडण्यात येईल. रोहा ते मुंबई दुपारी १ वाजता, रोहा ते ठाणे सकाळी ९ वाजता, तळा ते नालासोपारा सकाळी ८ व दुपारी २ वाजता, तळा ते मुंबई दुपारी १ वाजता, तळा-इंदापूर-बोरीवली दुपारी १२ वाजता, तळा-रोहा-बोरीवली ३ वाजता, कोलाड ते मुंबई दुपारी २.३० वाजता, कोलाड ते बोरीवली दुपारी २.३० वाजता अशा प्रमाणे बसेस रोहा आगारातून सुटणार आहेत.कोरोना नियमांचे पालन बंधनकारकएसटी प्रवासादरम्यान एसटी प्रवासाकरिता ई-पासची आवश्यकता राहणार नाही, एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी असतील, तसेच ग्रुप बुकिंगकरिता २२ प्रवासी आवश्यक असतील, प्रवासात सर्व प्रवाशांना कोरोनाविषयक नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे,महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांनी सोबत सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे. अशा नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याच्या सूचना रोहा आगारामार्फत देण्यात आल्या आहेत.प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रोहा आगाराने या विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांचे नियोजन गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसºया दिवसापासून करण्यात आले आहे. मुदतवाढ झाल्यास तसे रोहा आगाराकडून वेळोवेळी सूचित करण्यात येईल. तरी वरील मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करून आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :state transportएसटी