बोर्ली मांडला /मुरु ड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिप्रादन मुरु ड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रमेश नागावकर यांनी बोर्ली दत्तमंदिर येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्र मात केले. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवड करण्याची संकल्पना शासनस्तरावरून हाती घेतली आहे. झाडांमुळेच प्राणवायू मिळत असतो. त्यामुळे आपल्याला शुद्ध हवा पाहिजे असेल तर वृक्षलागवड करणे ही महत्त्वाची बाब असून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आपण समाजाचे तसेच सृष्टीचे काहीतरी देणे लागत असतो, ते देणे वृक्षलागवड करून त्याची थोड्या फार प्रमाणात परतफेड करता येईल, असे रमेश नागावकर म्हणाले. सरपंच भारती बंदरी, ग्रामसेवक अविनाश पिंपळकर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येकाने झाडांची लागवड करणे गरजेचे
By admin | Updated: July 5, 2016 02:20 IST