शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उरणमध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 16:25 IST

कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कामगारांना नोंदणीकृत करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मधुकर ठाकूर 

उरण : शनिवारी उरणच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात लाल बावटा बांधकाम कामगार संघटना स्थापन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.  सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(सीआयटीयु)या केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली या लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून उरणमधील असंघटित बांधकाम कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिक्रिया सीआयटीयुचे महाराष्ट्र राज्य सचिव भूषण पाटील यांनी  व्यक्त केली आहे. 

यावेळी या कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कामगारांना नोंदणीकृत करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कामगारांच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळच्या माध्यमातून विविध योजना लागू होणार आहेत. त्यानुसार अविवाहित कामगाराला लग्नासाठी ३० हजार रुपये,प्रधानमंत्री श्रमयोगी योजना,जीवणज्योती विमा,सुरक्षा विमा,महिलांना नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ तर शस्त्रक्रिया २० हजार आर्थिक सहाय्य, गंभीर आजारा साठी कुटुंबियांसह १ लाख रुपये, कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास ५ लाख तर नैसर्गिक मृत्यू नंतर २ लाखांची मदत तर मृत्यूनंतर पत्नीला दरवर्षी २४ हजार प्रमाणे पाच वर्षे मदत,त्याचप्रमाणे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी १ ली ते ७ वी प्रत्येक वर्षी २ हजार ५०० रुपये,८ वी ते १० साठी ५ हजार रुपये ,१० वी व १२ वी साठी १० हजार रुपये(यासाठी ५० टक्के गुण आवश्यक) पदवी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ही मदत देण्याची तरतूद आहे.

यामध्ये कामगारांना पत्नीला ही या योजनांचा लाभ मिळणार आहे. यावेळी सीआयटीयूचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुसूदन म्हात्रे,शशी यादव,जयवंत तांडेल,अनंत ठाकूर व निमंत्रक अरुण म्हस्के आदींनी कामगारांना मार्गदर्शन केले.यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धारही करण्यात आला.

टॅग्स :uran-acउरण