शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:20 IST

१४३ वर्षांची ‘खातनईची उघाडी’ गायब; रोजगार हमी योजनेतून नवी उघाडी बांधण्याकरिता महिला गावकीचा प्रस्ताव

- जयंत धुळप अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर गावातील धाकटा पाडा येथील ‘खातनईची उघाडी’च्या झडपा (दरवाजे) उधाणाच्या भरतीमुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्यामुळे गावातील ३३६ शेतकऱ्यांची १४९ हेक्टर भातशेती खाºया पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.जानेवारी २०१८ मध्ये शहापूरमधील शेतकरी महिलांनी तब्बल ८० हजार रुपये खर्च करून श्रमदानातून या ‘खातनईची उघाडी’च्या झडपा दुरुस्त करून भातशेती वाचवली. मात्र, खारलॅन्ड विभागाच्या शासकीय आराखड्यातून १८५० मध्ये केलेली तब्बल १४३ वर्षांची जुनी ‘खातनईची उघाडी’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.शासनाच्या आराखड्यात ‘खातनईची उघाडी’चा समावेश नसल्याने त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी निधी देता येणार नसल्याचे खारलॅन्ड विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या शेतकरी शिष्टमंडळास सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली. या वेळी महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनीही आश्चर्य व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या एप्रिल २०१४ मधील राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनेत ‘खातनईची उघाडी’सहच्या समुद्र संरक्षक बंधाºयाचा समावेश आहे. खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण महाराष्ट्र खारभूमी कायद्यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ‘कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण-रायगड, यांनी मौजे धाकटापाडा शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील खारभूमी विकास योजना तयार केली आहे. १८५० पासून पेझारी-धाकटे शहापूर असा मूळ समुद्र संरक्षक बंधारा होता. त्यामध्ये या खातनईच्या उघाडीचा समावेश होता. कालांतराने १९७५ मध्ये याच संरक्षक बंधाºयावरून पेझारी-धाकटे शहापूर हा रस्ता करण्यात आला. त्या वेळी खातनईच्या उघाडीच्या वर पूल बांधण्यात आला. मात्र, उघाडी तशीच राहिल्याचे धाकटे शहापूरचे ज्येष्ठ शेतकरी भास्कर रोहिदास पाटील यांनी सांगितले.भातशेती नापीक करण्याचा आरोपखातनईची उघाडी सुस्थितीत असेल, तरच गावातील ३३६ शेतकºयांच्या १४९ हेक्टर भातशेतीचे खाºया पाण्यापासून रक्षण होईल. भात पिकास कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, असा योजनेचा मूूळ हेतू असून, आता नेमकी हीच ‘खातनईची उघाडी’ खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने आराखड्यातून कागदोपत्री गायब केल्याने १४९ हेक्टर भातशेती नापीक करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.नवी उघाडी बांधण्याच्या महिला गावकीच्या प्रस्तावास ग्रामसभेत मंजुरीशहापूर ग्रामस्थांच्या जीवनमरणाशी निगडित खातनईच्या उघाडीऐवजी नवीन उघाडी बांधण्याकरिता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग निधी देऊ शकत नसल्याने आता रोजगार हमीतून ही नवी उघाडी बांधण्याचा प्रस्ताव महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा भास्कर पाटील यांनी ग्रामसभेत मांडला. त्यास ग्रामसभेने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव अलिबाग पंचायत समितीकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड