शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये माती माफियांमुळे पर्यावरणास धोका, डोंगर पोखरून उत्खनन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:43 IST

उत्खननासाठी नाममात्र रॉयल्टी शुल्क भरून त्या परवानगीखाली हजारो ब्रास मातीचे उत्खनन करून उखळ पांढरे करण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू आहे.

- दत्ता म्हात्रेपेण  - विकासाच्या नावाखाली पर्यावरण भकास झाल्याचे भयाण वास्तव चित्र सध्या पेण ग्रामीण डोंगर पट्ट्यात पाहावयास मिळत आहे. माती माफियांकडून डोंगरावर व माळरानावरील जमिनीवर खुलेआम दरोडा टाकला जातोय. यातील वैध किती अवैध किती माती उत्खनन केले जात आहे, याचा हिशोब घेणे शासकीय महसुलाच्या दृष्टीने आवश्यक आहे. उत्खननासाठी नाममात्र रॉयल्टी शुल्क भरून त्या परवानगीखाली हजारो ब्रास मातीचे उत्खनन करून उखळ पांढरे करण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे.महसूल यंत्रणेने याबाबत अधिक तपास, माहिती घेऊन या परवानगी व्यतिरिक्त अवैधरीत्या झालेल्या माती उत्खनन करणाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून शासनाचा स्वामित्व धनापोटी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवितात, त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. पेण तालुक्यातील पाबळ खोºयातील कळद जिर्णे व परिसरातील झालेले माती उत्खनन व इतर ठिकाणी झालेल उत्खनन पाहून संबंधित तलाठी सजाच्या कार्यक्षेत्रात हे उत्खनन झाले आहे; त्याची मोजमापे घेऊन संबंधिताकडून दंड आकारणीसह महसूल गोळा करावा, अशी मागणी होत आहे. पेण महसूल विभागाकडून २४ जानेवारीपर्यंत चावडी वाचनाचा धडक कार्यक्रम सुरू आहे.कार्यक्रम असलेल्या गावात, आदिवासी वाड्यांवर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रेलचेल सुरू आहे. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला असून, त्यांनी याबाबत तातडीने दक्षता घेत उत्खनन केलेल्या जागेची मोजमाप घेऊन तसा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. मात्र, यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया करून वसूल करणे नितांत गरजेचे असल्याने विभागीय महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी याबाबत संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करावी. राज्य शासनाच्या महसूल तिजोरीत खडखडाट असताना अवैध माती उत्खनातून शासनाच्या लाखो रुपयांचा कर बुडवून धंदा करणाºयांना वचक बसविण्यासाठी खणीकर्म विभागाने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.रात्रीच्या वेळी मातीची चोरी करण्याचे प्रकारसुद्धा वाढलेत, तर दुसरीकडे या प्रकारच्या अवैध माती उत्खनातून डोंगर, पठार, माळराने ओरबाडून उखळ पांढरे करणा-यांचा धंदा तेजीत आहे.पेणला महामार्गावर रुंदीकरणाचे माती भरावाचे काम सुरू आहे. मौजे कळद येथील माती उत्खननासाठी एक हजार ब्रासचे दोन व दोन हजार ब्रासचे दोन असे सहा हजार ब्रासची रॉयल्टी भरून या कार्यालयातून माती उत्खननासाठी परवानगी घेण्यात आली आहे. मात्र या व्यतिरिक्त अधिक उत्खनन केले असल्यास तसा अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून आल्यावर चौकशी होईल व संबधितावर उचित कारवाई करण्यात येईल.- शशिकांत वाघमारे, विभागीय महसूल कार्यालयाचे सहाय्यक

टॅग्स :environmentपर्यावरणRaigadरायगड