शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उरण बाजारपेठेत रानभाज्या दाखल; मागणी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:13 IST

ग्राहकांअभावी आदिवासींवर उपासमारीची वेळ

- मधुकर ठाकूरउरण : कोरोना महामारीच्या संकटातच उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, परंतु या रानभाज्यांकडे ग्राहकांनीच पाठ फिरविल्याने, ऐन मोसमातच आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर आणि जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवू लागतात. या रानभाज्या विकून आदिवासी आपली उपजीविका करतात. सध्या बाजारात कुल्लू, शेवाळी, अंबाडी, कंदमुळे, कुर्डू, टाकळा, भोकरं, वाघेटा, कंटोळा आदी प्रकारांतील रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळी हंगामात डोंगर, जंगलात नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या आणि उगवलेल्या या रानभाज्या औषधी व आरोग्याला अत्यंत गुणकारी असतातच. शिवाय रुचकर, स्वादिष्ट असतात. त्यामुळे फक्त पावसाळी हंगामातच मिळणाऱ्या या रानभाज्या बाजारात येण्याची प्रतीक्षा खवय्यांना नेहमीच असते.उरणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या रानभाज्या दाखल झाल्या आहेत. आदिवासी महिला या रानभाज्या विक्रीसाठी शहरात घेऊन येतात मात्र, कोरोनाच्या भीतीने उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्यांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. यामुळे ऐन हंगामातच रानभाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या आदिवासींचा या रानभाज्यांवरच या हंगामात उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा कोरोनामुळे रानमेव्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न थांबले, त्याचबरोबर आता रानभाज्यांची ही विक्री होत नसल्याने आदिवासी हवालदिल झालेआहेत.