शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:35 IST

Rajgad News: खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

रायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील जमिनी एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. परंतु खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ३८७.७७ इतके हरी-२ मध्ये मोडणारे क्षेत्र नगर रचना विभागाची विनापरवानगी संपादित करण्यात आले. ही सर्व जमीन खारभूमीचे उपजाऊ क्षेत्र आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून मोठे शहापूर पूर्व भागातील खार बंधिस्थीजवळ ५० मीटर लांबीचे व २० मीटर खोली असलेले भगदाड पडले आहे. त्यामुळे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान येथील संरक्षण बांध फुटून हाताताेंडाशी आलेले भात पिकामध्ये खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीचे पूर्व मशागतीचा खर्च, उत्पादनातील घट आणि रोजगार बुडाल्यामुळे तीन वर्षांत जवळपास दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याने एमआयडीसीने शहापूर-धेरंड परिसरातील १५० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यामार्फत शेतकऱ्यांनी केली आहे.

३५० खार बंधारे दुर्लक्षितचया भागातील शेती, गावे उच्चतम भरती रेषेच्या दाेन मीटर खाली आहेत. या क्षेत्राचे संरक्षण गेली ३५० वर्षे खार बंधारे करीत आहेत. येथील जमिनी एमआयडीसीने २००९ साली संपादित केल्यानंतर या खार बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरण याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. हे समजावून देण्यासाठी शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्यालयाजवळ दोन वेळा आंदोलने केली आहेत.

आश्वासनांवरच बोळवण२३ नाेव्हेबर २०१९ रोजी श्रमिक मुक्ती दल आणि सहायक मुख्य कार्यकरी अधिकारी अविनाश सुबेदार यांच्या दालनात बैठक झाली. सदर बैठकीत संपादनाशी निगडित बांधाची जबाबदारी एमआयडीसीने घेण्याचे इतिवृत्तातील मुद्दा क्रमाक पाचमध्ये मान्य केले. परंतु तात्पुरत्या दुरुस्तीपलीकडे आजतागायत काहीही झालेले नाही.

सामाजिक चळवळीची जन्मभूमीया जमिनीत सरखेल कान्होजी आंग्रे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत ना. ना. पाटील, दिवंगत तांडेल, जागतिक कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ओम्व्हेट, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या विचारांची आणि संघर्षाची बीज या मातीत दडली आहेत.

 एमआयडीसीने जमीन संपादित केल्यानंतर बांध बंधिस्थी सुस्थितीत ठेवण्याचे, त्याची दुरुस्ती करण्याचे मान्य केलेले आहे. असे असताना आता टाळाटाळ होत असल्याने त्यांची शिक्षा शेतकऱ्यांना भाेगावी लागत आहे. त्यामुळे आमचा हक्क मिळेपर्यंत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहणार आहे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Raigadरायगड