शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

एलिफंटा महोत्सवाची सांगता; देशी-विदेशी पर्यटकांनी लुटला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:45 IST

यावर्षी एलिफंटा महोत्सव स्वरंग ही या सोहळ्याची संकल्पना होती. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदीची रेलचेल होती

उरण : एलिफंटा बेटावर निसर्गाच्या सानिध्यात, नृत्याचा सुखद आनंद व शिल्प, दिव्यांग, अनाथ मुलांसाठी घडविण्यात आलेली लेण्यांची सफर, पर्यटकांसाठी हेरिटेज वॉक आणि चित्रकलेच्या आविष्कारात शनिवारपासून रंगलेल्या एलिफंटा महोत्सवाची गायक राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने सांगता झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शास्त्रीय संगीत, नृत्य गायनात रंगलेल्या महोत्सवाचा आनंद हजारो पर्यटकांनी लुटला.

मागील ३५ वर्षांपासून एलिफंटा बेटावर महोत्सवाचे आयोजन केले जाते. कधी आयोजकाअभावी, तर कधी काही तांत्रिक अडचणींंमुळे तर कधी बेटावर कायमस्वरूपी विजेच्या समस्येमुळे, तर कधी सुरक्षितेच्या कारणास्तव काही दोन ते पाच वर्षांचा अपवाद वगळता बेटावरच दरवर्षी फेब्रुवारीत एलिफंटा महोत्सवाचे आयोजन केले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून काही समस्या आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव एलिफंटा महोत्सव एलिफंटा बेटाऐवजी गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) येथे साजरा केला जात होता. एलिफंटा महोत्सव बेटावरच साजरा करण्यात यावा, अशी मागणी घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर आणि ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. एलिफंटा बेटावर मागील वर्षी कायमस्वरूपी वीजपुरवठा योजना भाजप-सेना आघाडी सरकारने कार्यान्वित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात साजरा होणारा महोत्सव उशिराने का होईना पुन्हा एकदा एलिफंटा बेटावर साजरा करण्याच्या निर्णयामुळे देशी-विदेशी रसिक पर्यटकांसह स्थानिकांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले होते.

यावर्षी एलिफंटा महोत्सव स्वरंग ही या सोहळ्याची संकल्पना होती. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदीची रेलचेल होती. रविवारी संध्याकाळी प्रख्यात गायक राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला. सलग दोन दिवस रंगलेल्या एलिफंटा महोत्सवाची सांगता शास्त्रीय संगीत, गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाने झाली. घारापुरी बेटावर गीत, संगीत चित्रकला अशा विविध कलागुणांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला. या आयोजित महोत्सवाची उत्सुकता देशी-विदेशी हजारो पर्यटकांना होती.