शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 17:46 IST

सावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत.

सिकंदर अनवारेलाेकमत न्यूज नेटवर्कदासगाव ः सावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आज महाडच्या रस्त्यावर उतरले. शहरातील स्वच्छतेसाठी तब्बल दीड काेटी रुपयांचा वाढीव निधी त्यांनी जाहीर केला.मुसळधार पावसाचा मोठा फटका महाडला बसला आहे.

महाड शहरात आणि बाजारपेठेत तब्बल 15 फुटांपर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छ करणे हे प्रमुख काम हाेते. महाड नगर पालिकेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः नगरविकास मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठवलेले ड्रनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महापालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे तीन फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे तीन फायर टॅंकर्स, तसेच ठाणे व खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशीन, रोगराई पसरू नये यासाठी धूरफवारणी करणारी फॉगिंग मशिन्स अशा समुग्रीचा समावेश आहे. 

शनिवारी सकाळी नऊ वाजता शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर 19 लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये, तसेच इतर रोगही शहरात पसरू नयेत. यासाठी आपण स्वतःच या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, रायगडटे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.महाड शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच ५० लाखांची मदत जाहीर केली होती, मात्र झालेले नुकसान पाहाता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे हि रक्कम दाेन काेटी रुपये झाली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaigadरायगडRatnagiri Floodरत्नागिरी पूर