शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक कामाचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:28 IST

रायगड लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा एकूण आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा एकूण आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची कार्यपद्धती त्यांनी प्रत्यक्षपणे समजून घेतली. निवडणूक कालावधीत काम करताना गांभीर्याने; परंतु ताणविरहित काम करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. प्रशिक्षणाचे दुसरे सत्र शनिवारी उशिरा सर्व विधानसभा मतदारसंघात पार पडले. येथील पीएनपी नाट्यगृहात त्यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्याता आला.निवडणूक कर्मचाºयांनी निवडणुकीचे काम सकारात्मकतेने आणि समन्वयाने करावे. केंद्राध्यक्ष हा केंद्राचा प्रमुख असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली केंद्रावरील सर्वांनी निवडणुकीचे काम करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले. निवडणूक आयोगाने प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीने काम करावयाचे आणि कुठल्या अडचणी आल्या तर कोणती कृती करायची हे व्यवस्थित दिले आहे. मतदानाअगोदर अभिरूप मतदान कसे करायचे त्याविषयीही मार्गदर्शन केले आहे. भारत इलेक्ट्रॉनिकचे तंत्रज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. व्हीव्हीपॅट मशिन आणि त्याची कार्यपद्धती, ईव्हीएम मशिन याबाबतची सर्व तांत्रिक मदत मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कर्मचारी, अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मतदान प्रमाण वाढीसाठी मतदारसंघात घेतले जाणारे प्रयत्न सफल होतील, असेही त्यांनी सांगितले. मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाºयांचे दुसºया टप्प्यातील प्रशिक्षण अलिबाग, पेण, महाड, दापोली, श्रीवर्धन, गुहागर येथे पार पडले. या प्रशिक्षणात पहिल्या प्रशिक्षणात झालेल्या कामांची उजळणी करण्यात आली. मतदान केंद्रावर घ्यायची खबरदारी आणि आयोगाच्या विविध सूचना याबाबत माहिती देण्यात आली. टेंडर व्होट चॅलेंज व्होट तसेच मतदान केंद्रात दिव्यांगांसाठी करावयाच्या विशिष्ट सुविधा, उन्हाळ््याच्या दृष्टिकोनातून घ्यायची खबरदारी या सर्व बाबतीत कर्मचाºयांना अवगत करण्यात आले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मायक्र ो आॅब्झर्वर अर्थात सूक्ष्म निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण सोमवारी १५ एप्रिल रोजी होणार आहे.