शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:14 IST

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. 

दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर काल संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर आज सकाळी ६.३० वाजता पु्न्हा बचावकार्य सुरु करण्यात आले.

एका स्थानिक तरुणाने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पावसाच्याआधी इर्शाळवाडी गाव खाली असलेल्या नम्राचीवाडी या गावात स्थलांतरित झाले होते. मात्र तिथे वनविभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ती घरे तोडण्यात आली. एकदा नव्हे, तर दोनदा-तीनदा वन विभागाचे आदिवाशींनी बांदलेल्या झोपड्या तोडल्या. त्यामुळे हे गावकरी पुन्हा इर्शाळवाडीमध्ये राहण्यासाठी आले आणि ही घटना घडली. पावसाळा संपेपर्यंत वन जमिनीवर या रहिवाश्यांना राहू दिले अशते, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. 

दुर्घटना झाल्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. डोंगर भागावर हे गाव असल्याने कोणतेही यंत्रसामुग्री पोहचणे अवघड आहे. त्यामुळे पावडे, घमेल आणि इतर हाती सामग्रीने शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. पावसाचा जोर असतानाही पथक हे आपले काम बजावत आहेत. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजल्यापासून पथक यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आज शोध मोहिमेत कोणाचे मृतदेह भेटतात का किंवा कोणी दैव कृपेने जिवंत आहे का याचा शोध पथकातर्फे सुरू आहे.

पायथ्याशी नियंत्रण कक्ष-

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. पाऊस ही पडत असल्याने काही प्रमाणात शोध मोहिमेत अडचणी येत आहे. घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

जिल्ह्याला आज रेड अलर्ट

रायगड जिल्ह्याला शुक्रवार पुन्हा हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळ पासून पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. रेड अलर्ट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार