शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

गणेशोत्सवात रायगड पोलिसांकडून चाकरमान्यांची वाहन दुरुस्त

By निखिल म्हात्रे | Updated: September 29, 2023 19:31 IST

मागील 15 दिवसात गणेश भक्तांची सुमारे 227 वाहन ड्युटी बजावित असलेल्या पोलिसांनी दुरूस्त केली आहेत.

अलिबाग-गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या भक्तांच्या वाहनाला कोठीही हानी पोहोचू नये म्हणून रायगड पोलिसांनी विषेश खबरदारी घेतली होती. वडखळ ते महाड दरम्यानच्या रस्त्यात होणाऱ्या पंक्चर गाड्यांना तात्काळ स्टेपनी बदलण्यासाठी स्वता पोलिस कर्मचारी वाहन चालकाला मदत करीत होते. तर काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या चारचाकी, तिनचाकीसह दुचाकीचे काम करून त्या सुरु करीत होते. मागील 15 दिवसात गणेश भक्तांची सुमारे 227 वाहन ड्युटी बजावित असलेल्या पोलिसांनी स्वता दुरूस्त केली आहेत.

एकीकडे पोलिस म्हटल की सारेजण लांब पळत असत, मात्र सध्या रायगड पोलिसांनी सकारात्मकपणे नागरीकांना मदत केल्याने पोलिसांना देव मानू लागले आहेत. सामान्य माणासाच्या समस्या सोडणविण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे नेहमिच अग्रही असल्याने नागरीक मोठ्या आशेनेच त्यांच्याकडे जातात. याच धरतीवर गणेशोत्सवादरम्यान नागरीकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मागील 15 दिवसांपासून रायगड पोलिसांनी कंबर कसली होती. तर कोकणात जाणाऱ्या भक्तांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी पोलिस, सुविधा केंद्र अशा विविध उपाय-योजना करण्यात आल्या होत्या. 

17 ते 18 सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या अधिकच वाढली होती. यावेळी एखादी गाडी पंक्चर झाली वा बंद पडली तर ट्रफीक सारख्या समस्येला सामोर जाव लागत होती. ट्रफीकची समस्या सोडविण्यासाठी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी स्वता भक्तांच्या पंक्चर गाड्यांच्या स्टेपनी बदलून देत होते. तर काही पोलिस कर्मचारी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या गाड्या सुरु करून देताना दिसत होते. त्यामुळे सामान्य माणूस आणि पोलिस यांच्या दरी दुर होण्यास मदत झाली आहे.बंदोबस्तासाठी असताना गणेशभक्तांच्या गाड्या पंक्चर होत असत. त्यामुळे काही ठिकाणी ट्रफिक होत असे, हे ट्रफीक कमी करण्यासाठी आम्ही स्वता मॅकनिक बनुन गाडीची स्टेपणी बदलत होतो. त्यामुळे वाहन चालवून थकलेल्या चालकाला ही आराम मिळत होता, तर दुसरीकडे त्यांचे मिळणार आशिर्वाद आमच्यासाठी महत्वाचे होते. - अभिजित पोटे, हवालदार.

घरात गणपती असूनही मागील दहा दिवस आमचे कर्मचारी नागरीकांचे सेवेसाठी रस्त्यावर उभे होते. काही पोलिस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतीचे दर्शन ही घेता आले नाही. मात्र नागरीकांची सेवा करणे हाच गणेशाचा मोठा अशिर्वाद असल्याचे सांगत होते. तर स्वता एक अधिकारी म्हणून जेव्हा भक्तांची मदत करीत असतानाच आम्हाला मदत केलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील हासूतच बाप्पाचे दर्शन झाले. - अतुल झेंडे, अपर पोलिस अधिक्षक.गणेशोत्सव हो कोकण वासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वीच संपुर्ण नियोजन केले होते. या नियोजनासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रोल महत्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी आपल्या ड्युटी व्यतिरीक्त गणेश भक्तांना केकेली मदत वाखाण्याजोगी आहे. तर परतणाऱ्या गणेशभक्तींनी ही पोलिसांचे मनपुर्वक अभिनंदन केले.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवalibaugअलिबागPoliceपोलिस