शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्त्याची साइडपट्टी गेली वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:51 IST

पेपरमिल ते धानकान्हे हा १२.२५० कि.मी. चा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता.

मिलिंद अष्टीवकर रोहा : तालुक्यातील पेपरमिल ते धानकान्हे हा १२.२५० कि.मी. चा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता. २०१८ मध्ये पेपरमिल ते देवकान्हे हा ११ किमीपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला होता. मात्र हा रस्ता पेपरमिल ते देवकान्हेपर्यंत पहिल्याच पावसात साइडपट्टी वाहून गेल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. या मार्गावरील वांदेलीच्या हद्दीतील रस्त्याच्या बाजूच्या साइडपट्टी वळणावर वाहून गेल्या आहेत. याशिवाय ठिकठिकाणी साइडपट्टीचा अभाव असल्याने व कालव्याच्या उंचीनुसार रस्त्याची उंची नसल्याने त्रासदायक ठरत आहे.या मार्गावरील पेपरमिल ते देवकान्हे या ११ किमी अंतरावरील काम पूर्ण झाले आहे. मात्र ३ मीटरचा रस्ता आणि दोन्ही बाजूला १.५० मीटर साइडपट्टी असणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही असे स्पष्ट ठिकठिकाणी असलेल्या साइडपट्टीवरुन दिसत आहे. आता या मार्गावरील रस्ता हा खराब झालेला आहे. साइडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. कारपेटला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.याच रस्त्याचा पुढील भाग असलेला देवकान्हे ते धानकान्हे हा १.२५० किमीचा रस्ता रखडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्व्हे केल्याप्रमाणे रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्याची जागा अजून शेतकऱ्यांच्या नावावर असल्याने शेतकरी भूसंपादनाचे पैसे मागत आहेत. मात्र तशी तरतूद ही आपल्या बजेटमध्ये नसल्याने हा रस्ता रखडला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी देवकान्हे ग्रुप ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांची समजूत घालण्यासाठी पत्र दिले होते. मात्र ग्रामपंचायतीने शेतकरी तयार होत नाहीत असे स्पष्ट पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत रस्ता आमच्याकडून पूर्ण होणार नाही, असे जिल्हा परिषद शाखा अभियंता आनंद गोरे यांनी सांगितले.>रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांना शंकामुख्य रस्त्यावरुन सोनगाव, मालसई, कारिवणे, हार्डी, हाल, कवळठे, तळवडा आदिवासीवाडी चणेरा, डोलवहाल आणि तिसे हे रस्ते मुख्य रस्त्यापासून या गावांना जोडले जातात. या रस्त्यांची कोट्यवधीची मंजुरी जिल्हा नियोजन डेव्हलपमेंट कमिटीमधून झाली आहे. ही कामे तरी चांगली होतील ना असे स्थानिक नागरिकांतून विचारणा होत आहे.