शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे कर्जत-चौक रस्त्याची दुरवस्था, एमएमआरडीएकडून रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:18 IST

कर्जत-चौक रस्ता सुस्थितीत नसताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दोषादायित्व कालावधी संपताच, जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता वर्ग केला.

कर्जत : कर्जत-चौक रस्ता सुस्थितीत नसताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दोषादायित्व कालावधी संपताच, जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता वर्ग केला; परंतु हा रस्ता सुस्थितीत नसल्याचा विस्तृत अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने एमएमआरडीएला दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.कर्जत-चौक रस्त्यालगत अनेक मोठमोठ्या धनिकांचे, राजकीय नेते मंडळींचे बंगले आहेत. याच रस्त्यावरून हजारोच्या संख्येने गाड्यांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. या रस्त्याबाबत कोणताही राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधी काही बोलण्यास तयार नाही, वा संबंधित अधिकाºयांस जाब विचाराला तयार नाही.कर्जत-चौक रस्त्यावर प्रवास करणाºया दिगंबर चंदने या नागरिकाने ६ जुलै २०१७ रोजी एमएमआरडीएकडे माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत-चौक रस्त्याच्या निविदा केव्हा काढण्यात आल्या व हे काम कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले. याबाबत २१ मे २०१२ रोजी निविदा मागविण्यात आल्या व हे काम मे. वालेचा इंजिनीअरिंग लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. रस्त्याचे काम दोन वर्षांच्या मुदतीत पूर्ण करायचे होते. सध्याची रस्त्याची स्थिती काय आहे? अशी विचारणा केल्यावर या रस्त्याची पाहणी करून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २१ एप्रिल २०१७ रोजी ताब्यात देण्यात आला आहे, असे सांगितले. दरम्यान, २१ एप्रिल २०१७ रोजी कोकण भवन येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहून कर्जत ते चौक रस्ता राज्य महामार्गावरील मोºया व पुलासहित मजबुतीकरण व रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरण करणे (भाग-५) कामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएमआरडीएकडे तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आला होता. डांबरीकरणाच्या कामात दोषादायित्व कालावधी २ वर्षांचा असून, काँक्रीट रस्त्याचा ५ वर्षे आहे. या रस्त्यावरील कामाचा दोषादायित्व कालावधी ३० एप्रिल २०१७ रोजी संपत आल्याचे कळविले होते. या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम खात्याची असल्याने, हा रस्ता हस्तांतरित करून दुरुस्ती करावी, असे नमूद केले.

टॅग्स :Raigadरायगडhighwayमहामार्ग