शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 08:45 IST

गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा यंदा ‘वाहतूककोंडी व खड्डे मुक्त’ प्रवास होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. त्यात वाहतूककोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून, जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळून या काळात इतर सर्व १६ टनांच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

रायगड जिल्हा शांतता कमिटीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी घार्गे यांनी या तयारीबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रत्येक विभागाचे अधिकारी, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. 

महामार्गावर चोख बंदोबस्त- चाकरमान्यांचा प्रवास हा निर्विघ्न व्हावा, यासाठी रायगड पोलिसांचा बंदोबस्तही चोख राहणार आहे. - यामध्ये १२ उपविभागीय पोलिस अधिकारी, २८ पोलिस निरीक्षक, ८१ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ७४२ पोलिस अंमलदार, ५० होमगार्ड यांच्यासह ४० मोटारसायकली, ७२ वॉकीटॉकी, १८ टोकन क्रेन, १८ रुग्णवाहिका, ५८ सीसीटीव्ही तैनात राहणार आहे. महामार्गावर मोटारसायकल पेट्रोलिंगही सुरू राहील. - यासाठी ४० मोटारसायकली, १३० अंमलदार, ३० अधिकारी असून प्रत्येक पाच किमी परिसरात त्यांचे लक्ष राहील.

अवजड वाहनांना बंदीगणेशोत्सव काळात ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १३ सप्टेंबर ११ वाजेपर्यंत, तसेच १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापसून ते १८ सप्टेंबर रोजी रात्री ४ वाजेपर्यंत १६ टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी राहील.

गणेश भक्तांसाठी सुविधा केंद्रे खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी, पोलादपूर येथे सुविधा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये चहापान कक्ष, वैद्यकीय कक्ष, फोटो गॅलरी, पोलिस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहनतळ, वाहन दुरुस्ती कक्ष तयार केले जाणार आहेत.

फलक नसल्यास कारवाई

रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग हद्दीतील अनेक ठिकाणी दुभाजक आहेत. मात्र, या ठिकाणी सूचना फलक लावले नसल्याने वाहनचालक यांना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अपघातही होत आहेत. गणपतीपूर्वी दुभाजक ठिकाणी सूचना फलक लावलेत का? याची प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी करावी. यामध्ये कुचराई झाली आणि अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४