शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

द्रोणागिरी किल्ला मोजतोय अखेरची घटका, ओएनजीसीच्या बंधनांमुळे किल्ल्याची डागडुजी अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 00:04 IST

Dronagiri fort News : रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे.

- मधुकर ठाकूर उरण : सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील उरणच्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर असलेला ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला कायमच दुर्लक्षित राहिला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी ओएनजीसी असल्याने पुरातन विभागही या किल्ल्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे असंरक्षित राहिलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा ऐतिहासिक दुर्मीळ ठेवा पडझडीमुळे दृष्टिआड होण्याच्या मार्गावर आहे.रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे. उरण तालुक्यातील करंजा गावाजवळ असलेला किल्ला ऐतिहासिक काळापासूनच महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील किल्ल्याची १५३० मध्ये पोर्तुगीज लोकांनी डागडुजी केली. १५३५ मध्ये अँटोनो-डे-पोर्टो यांनी नोसा सेन्होरा, एन.एस.डी. पेना आणि सॅम फ्रान्सिस्को या तीन चर्च बांधले. १६ व्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. १० मार्च, १७३९ रोजी हा किल्ला मनाजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. तेथे एक चर्च आहे. येथे असलेल्या मूर्ती शिलालेखशिवाय आहेत. चर्च आतल्या तटबंदीमध्ये आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या दक्षिणेस ५० मीटर अंतरावर आहे. गेटची कमान तुटलेली आहे. संरक्षकांच्या खोल्यांचीही स्थितीही दयनीय आहे. गल्लीच्या दगडावर कोरलेला गणपती एका संरक्षक कक्षात ठेवला आहे. दयनीय झालेल्या अवस्थेत वेताळ मंदिर आहे.या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी ओएनजीसी प्रकल्प आहे. प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी या डोंगरावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा सशस्त्र पहारा आहे.द्रोणागिरी किल्ल्याची नोंद राष्ट्रीय राज्य संरक्षित स्मारकातही नोंद नसल्याचे सांगण्यात येत आहे. या किल्ल्यांची एमएमआरडीएने नोंद घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तेही प्रयत्न विफल ठरले आहेत. येथील ओएनजीसी प्रकल्पांच्या काही बंधनांमुळे पुरातन विभागही या किल्ल्याकडे लक्ष देण्यास राजी नाही. त्यामुळे असंरक्षित राहिलेला द्रोणागिरी किल्ल्याचा ऐतिहासिक दुर्मीळ ठेवा पडझडीमुळे दृष्टिआड होण्याच्या मार्गावर लागला आहे. परिसरातील काही गड, दुर्गप्रेमी संस्थांकडून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ते पुरेसे नसल्याने राज्य संरक्षित स्मारक विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया गड, दुर्गप्रेमी संस्थेचे सदस्य डॉ.सत्यजीत ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

ओएनजीसीने द्रोणागिरी डोंगर परिसरातील काही भाग सील करून प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात केले आहेत. किल्ल्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी आधी असंरक्षित स्मारक संरक्षित करण्याची गरज आहे. या आधीही किल्ल्याची एमएमआरडीएने नोंद घेण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.    - डॉ. मयूर ठाकरे,     (राष्ट्रीय स्मारक विभागाचे   टेक्निकल असिस्टंट, पुरातत्त्व     विभागाचे जनसंपर्क अधिकारी)  

टॅग्स :Raigadरायगड