शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 00:04 IST

यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : नळाला येणारे पाणी बंद झाले...दैनंदिन कामासाठी पाणी तर लागतेच...पाणी अणण्यासाठी पायपीट करावी लागते...जेथे पाणी उपलब्ध होईल तेथे जावे लागते...गालसुर येथे बोअरवेलला पाणीच नाही...एकच विहीर पाणी आणण्यासाठी उपलब्ध आहे येथेही मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी गर्दी होते, त्यातून जसे पाणी उपलब्ध होईल असे आणावे लागते...हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत सध्या करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया रचना नादिवकर या गालसुरे येथील महिलेने दिली आहे.यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वावे, धनगरमलई, गुलधे, बापवली, साक्षीभैरी या गावांना तालुका प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे, परंतु तालुक्यातील इतर गावाचा प्रश्न उत्तरोत्तर बिकट बनत आहे. नियमित रोजंदारीवर काम करून उपजीविका चालवणाऱ्या लोकांना पाण्यासाठी रोजगार बुडवावा लागत आहे. घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे असे चित्र सध्या श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पहावयास मिळत आहे. पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठले आहेत, विंधनविहिरी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरत आहेत , गावातील जुने हातपंप जास्तीत जास्त नादुरुस्त आहेत. सुव्यवस्थित हातपंप अशुद्ध पाणीपुरवठा करत आहेत त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दिवस व रात्री लोकांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे .कोकणाच्या लाल मातीचा पोत बघता तिची पाणी साठवण क्षमता कमी आहे. निसर्गत: कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत कोकणात जलस्रोत साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. धरण, बंधारे यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. श्रीवर्धन तालुक्यात रानवली, कुडकी या दोन धरणाचा अपवाद वगळता इतर सरकार निर्मित स्रोतांचे प्रमाण फारच कमी आहे. बापवन, गालसुरे, निगडी, सायगाव, आडी, धारवली, मेघरे, हुन्नरवेली, वेळास, भरणा, वांजळे, दिघी, सर्वा, आदगाव, वडघरपांगळोली, गडबवाडी, मोहितेवाडी व कोलमांडला या ग्रामीण भागातील गावातील पाणीप्रश्न बिकट बनला आहे .हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन येथील पर्यटन व्यवसायाला दुष्काळाच्या झळा पोहचत आहेत. धनगरमलई, वावे, नागलोली, गुलधे या गावांचा पाणीप्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी यंत्रणेच्या विविध अभियान व उपक्रमांची दिशा व दशा यांचे चिकित्सक अवलोकन आणि परीक्षण अगत्याचे आहे, अन्यथा आगामी काळात संबंधित गावांचा प्रश्न अधांतरी राहील. ग्रामीण भागातील पेयजलाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पशुधन सांभाळणे जिकरीचे ठरत आहे. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. कोकणातील मान्सून लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्यात दुष्काळ दाह सोसावा लागणार आहे.

दूध उत्पादन घटलेयावर्षी पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पयार्याने दूध उत्पादन घटले आहे. जोरदार फटका दूध व्यवसायाला बसला आहे.- मोतीराम परभळकर, दूध व्यावसायिक, बोर्लीपंचतनदिवसाआड पाणीधनगरमलई,वावे,नागलोली या गावाच्या पाणी प्रश्नी सरकारी यंत्रणेकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी गावात पाणीप्रश्न निर्माण होतो. टँकरने पाणीपुरवठा हा कायमचा उपाय होऊ शकत नाही त्यासाठी निर्णायक भूमिका सरकारदरबारी घेणे गरजेचे आहे. आम्हाला दिवसाआड पाणी मिळते ते सुद्धा मुबलक प्रमाणात मिळत नाही.- तृप्ती विचारे, शिक्षिका, नागलोलीपर्यटन व्यवसायाला फटकायंदा पाणीटंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटक येतात परंतु त्यांना योग्य सोईसुविधा पाण्याअभावी देणे अवघड ठरत आहे. नगरपालिकेकडून एकदिवसा आड पाणीपुरवठा केला जातो. नगरपालिकेने लवकरात लवकर टँकरने पाणी उपलब्ध करावे.- बाळा वाणी, हॉटेल व्यावसायिक, श्रीवर्धनपाणी हे जनावरांची देखील मुख्य गरज आहे. आमच्याकडील म्हशी, गायीचे पालन करणे कठीण झाले आहे. त्यांना चारा मिळणे अवघड झाले आहे, यामुळे दूध कमी निघते परिणामी दुधातून मिळणारे पैसे कमी झाले आहेत, यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे.- उल्हास चितळे, शेतकरी, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड