शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

रुग्णांचा पूर्वेतिहास तपासूनच डाॅक्टरांनी औषधे द्यावीत!आजाराची माहिती देण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:15 AM

रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मध्यंतरी रेमडेसिविर   इंजेक्शन दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ९० रुग्णांना साइड इफेक्ट झाला हाेता.

 रायगड : काेराेनाला राेखण्यासाठी सर्वत्रच युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांवर उपचार करताना विविध औषधांचा वापर करण्यात येताे. त्यामध्ये प्रामुख्याने रेमडेसिविरमुळे रुग्णांना त्रास झाल्याचे काहीच दिवसांपूर्वी समाेर आले हाेते. त्यामुळे काेराेनावर उपचारा दरम्यान रुग्णांनी संबंधित डाॅक्टरांना आपल्या आजाराबाबत अवगत करावे तसेच डाॅक्टरांनी रुग्णांची केस हिस्ट्री तपासूनच औषधे द्यावीत, असे तज्ज्ञ डाॅक्टरांचे मत आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या अद्यापही म्हणावी तशी आटोक्यात आल्याचे दिसत नाही. सरकार आणि प्रशासन काेराेनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मध्यंतरी रेमडेसिविर   इंजेक्शन दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ९० रुग्णांना साइड इफेक्ट झाला हाेता. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयातील हाेते. प्रशासनाने  रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्व साठा परत घेतला हाेता. या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली हाेती. त्याचप्रमाणे स्टेराइडचा डाेसही काेराेना रुग्णांना दिला जातो . सध्या तरी काेणत्याही रुग्णावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याची सरकार दप्तरी नाेंद नाही.

काय हाेतात परिणाम रेमडेसिविर इंजेक्शनमुळे उलटी, मळमळणे, अंग लाल हाेणे, अंगावर पुरळ येणे, अंग कापणे असे परिणाम हाेऊ शकतात. किडनी आणि लिवर, ह्रदयासंबंधी आजार असतात त्यांनाही त्याचे  वाईट परिणाम हाेऊ शकतात. स्टेराॅइडचा वापर एखाद्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांना दिल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक वाढू शकते. इन्सुलिन देऊन त्यांचे साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणावे लागते.

साखरेचे प्रमाण नियत्रंणात असावे अंगावर पुरळ येणे, मळमळणे, उलटी येणे, अंग लाल हाेणे असे दुष्परिणाम दिसून येतात. तसेच किडनी, ह्रदयराेग, लिव्हरसंबंधी आजार आहेत. त्यांची केस हिस्ट्री तपासूनच त्याचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा ते डॅमेज हाेण्याची शक्यता असते.

स्टेराॅइडच्या वापरामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्याला मधुमेह आहे आणि ज्याला काेराेना झाला आहे. त्याच्यावर स्टेराॅइडचा वापर केल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. तसेच ते नियंत्रणात आणण्यासाठी इन्सुलिनशिवाय पर्याय राहात नाही.

रेमडेसिविरचे साइड इफेक्ट रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन टाेचण्यात आल्याने सुमारे ९० रुग्णांना मळमळणे, उलटी, अंग कापणे, रॅशेस असा काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या हाेत्या. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने काेविकाेफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल २१०१३ इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले हाेते. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत हाेते. तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

ज्यांना कॅन्सर, किडनी, ह्रदय, लिव्हर, मधुमेह असे आजार असतील त्यांनी अधिक काळजी घेत घराबाहेर पडून नये, काेराेनावरील उपचार करताना आपल्या आजाराची माहिती डाॅक्टरांना देणे गरजेचे आहे. संबंधित डाॅक्टरांनी त्यांची केस हिस्ट्री पाहावी. - डाॅ. राजीव तांबाळे, फिजिशियन

काेराेना हाेऊ नये यासाठी प्रथम सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दी टाळावी, वेळेवर टेस्ट करून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. रेमडेसिविर आणि स्टेराॅइड देताना संबंधित डाॅक्टरांनी रुग्णांची केस हिस्ट्री तपासूनच त्याचा आवश्यक असल्यास वापर करावा.- डाॅ. प्रणाली पाटील 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर