शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला रु ग्णांच्या नातेवाइकांकडून मारहाण , अलिबागमधील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:16 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.

अलिबाग : जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे जिल्हा सामान्य रु ग्णालयातील रु ग्णांचे मात्र चांगलेच हाल झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंतगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिला २५ जून रोजी दाखल झाली होती. महिलेची प्रसूती झाल्यानंतर टाके घालण्यात आले नव्हते. याबाबत महिलेच्या नातेवाइकांनी डॉ. पांडकर यांना विचारणा केली. त्या वेळी डॉ. पांडकर हे दुसºया महिला रुग्णाच्या शस्त्रक्रियेत व्यस्त होते. दोन तास झाले तरी प्रसूतीपश्चात टाके घातले गेले नाहीत. रु ग्णाला तत्काळ बघितले गेले नाही याचा राग मनात धरून रु ग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. पांडकर यांनारुग्णालयातच मारहाण केली. डॉक्टरला मारहाणीनंतर अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी डॉक्टरांनी एकत्र येत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या घटनेमुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरRaigadरायगड