शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत प्रदूषण पुन्हा वाढले; नवी मुंबईतील सर्वच शहरात प्रदूषणाचा इंडेक्स 200 वर

By वैभव गायकर | Updated: November 14, 2023 13:45 IST

दिवाळीच्या दोन तीन दिवसात प्रदूषणाचा मीटर  200 च्या पुढे गेला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल:वाढत्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.शासन याबाबत उपाययोजनांवर भर देत आहे. न्यायालयाने देखील फटाके फोडण्यासाठी वेळेचे निर्बंध लादले होते.मात्र दिवाळीच्या दोन तीन दिवसात प्रदूषणाचा मीटर  200 च्या पुढे गेला आहे.

एकंदरीत दिवाळी च्या अतिशबाजी नंतर, आणि हवेत जमलेल्या सूक्षम धुळीच्या कणातून, त्यात हवेतील दमटता, प्रदूषणकारी कारखाने ,वाढणारी प्रचंड बे-लगाम वाहतूक त्यात   सर्वात मोठी भर टाकणारा बांधकामचा वेग, यामुळे बेफाम आणि सुसाट सुटलेल्या प्रदूषणाचा वेग आवरणे आता कठीण होत असल्याचे दिसुन येत आहे.सीपीसीबी (CPCB ) ने विकसित केलेल्या समीर (Sameer या app) च्या अनुषंगाने आज 24 तासाचा हवेची गुणवत्ता अत्यंत नित्कृष्ट दर्जा असल्याची दर्शवते.

त्यात कळंबोली स्थित  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बसविलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI )मशीन यंत्रणाच बंद असल्याने याठिकाणचे प्रदूषणाचे मोजमाप होऊ शकले नाही.चार दिवसांपूर्वी याच मशीनवर प्रदूषणाचा इंडेक्स 300 च्या पुढे दाखविण्यात येत होते.सध्या हि यंत्रणा  नादुरुस्त किव्हा एनए असल्याची दाखवत आहे.एमआयडीसी तोंडरे मध्ये तर स्वतः सीबीसीबी  मान्य करीत आहे .दि.13 रोजी रात्री 10 वाजुन 5 मिनिटांच्या सुमारास हि गुणवत्ता सरासरी 24 तासात 202 आहे .जी 100 च्या आत पाहिजे.पनवेल शहरासह नवी मुंबई मधील नेरुळ 167, महापे 154,नेरुळ 212,कोपरी पाडा (वाशी) 250,सानपाडा 204,तळोजा एमआयडीसी मधील तोंडरे याठिकाणी बसविलेल्या यंत्रणेत एअर क्वालिटी इंडेक्स 202 दाखविण्यात आला.

ऐन दिवाळीत मोजमाप करणारी यंत्रणा बंद कशी पडते ?

कळंबोली याठिकाणी  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बसविलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI )मशीन यंत्रणाच बंद असल्याने याठिकाणचे प्रदूषणाचे मोजमाप होऊ शकले नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणDiwaliदिवाळी 2023