शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या ३० वर्षांतील मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:38 IST

सुनील तटकरे : पेण येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आघाडीची सभा

पेण : भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश होणार असेल तर या तरुणांच्या रोजगाराचा विचार आताच व्हायला हवा. गेल्या ३०वर्षांतील आपल्या मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी पाहिली तर विदारक असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. देशात रोजगार निर्माण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी के ले.

सोमवारी ते पेण येथील आगरी समाज भवन येथे आयोजित राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते. भाजपा आणि त्यांच्यासोबत फरफटणारी शिवसेना यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ फक्त एकमेकांवर टीका करण्यातच गेला. सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेने सरकारच्या प्रत्येक निर्णयावर केवळ टीकाच केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्येक अग्रलेखातून पंतप्रधान, मुख्यमंत्री व भाजपावर टीकाच होताना आपण पाहत आलो. पण आता सत्तेसाठी यांनी युती केली आहे. मात्र, ही युती गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी, तरु णांसाठी, महिलांसाठी काही करू शकली नाही, याबाबत आता जनताच त्यांना उत्तर देणार आहे, असे म्हणत तटकरे यांनी युती सरकारचा समाचार घेतला.

नागोठणे परिसरातील बेणसे गावात सभामंडपाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा उल्लेख गीते यांच्या कार्यअहवालात केला आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे फोटो पाठवून तिथे सभामंडप झालाच नसल्याचे सांगितले आहे. हा सभामंडप चोरीला गेला की काय? असा टोला लगावत सुनील तटकरे यांनी गीते यांच्या कार्यअहवालातील खोटेपणा उघडा पाडला. अशी फसवाफसवी करत आजवर तुम्ही निर्वाचित झालात पण आता लोक शहाणे झाले आहेत. ते तुमच्या भूलथापांना फसणार नाहीत, असे तटकरे यांनी नमूद केले. आपण खासदार झाल्यानंतर रायगडमध्ये कागदाचा कारखाना आणू, त्यासाठी बांबूची लागवड करा, अस गीतेंनी सांगितलं होतं. तो कागदाचा कारखाना आजतागायत आला नाही. पंतप्रधानांनी विरोध केला म्हणून कारखाना आणू शकलो नाही, असे ते एकदा मुलाखतीत बोलले होते. आता युती झाल्यावर त्यांनी हे पुन्हा बोलून दाखवावे, असे आव्हान तटकरे यांनी केले.यावेळी आ. धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, बापूसाहेब नेने, चंद्रकांत पाटील, सीताराम कांबळे व तालुक्यातील पदाधिकारी तसेच आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसraigad-pcरायगड