जिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:36 AM2019-11-13T00:36:39+5:302019-11-13T00:36:44+5:30

रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात.

Dirt empire in a district hospital | जिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य

जिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य

Next

अलिबाग : रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या याच सरकारी रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी कचरा, वाया गेलेले अन्न, बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, नाल्यावरील तुटलेली झाकणे यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाइकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने यामध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात. अलोपॅथी उपचार पद्धतीबरोबरच, आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दररोज येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या ही सुमारे ५०० च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते. त्यामुळे येथे येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या संख्येचा विचार केल्यास या ठिकाणच्या परिसराचा, स्वच्छतागृहाचा, कॉरिडोरचा वापर केला जातो. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी कचरा, फेकलेले अन्न, बाटल्या, सिगारेटची पाकिटे, गुटख्याच्या पुड्या अशा प्रकारचा कचरा जमा होतो.
रुग्णालयाचा वापर मोठ्या संख्येने होत असल्याने तेथील स्वच्छताही सातत्याने राखली जाणे गरजेचे आहे. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या कचºयामुळे दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूकडे तर घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे काही क्षण उभे राहणेही मुश्कील झाले आहे. याच ठिकाणी बाहेरून उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांना आसरा घ्यावा लागत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
>या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण येतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कोणीच येत नाही, त्यामुळे महत्त्वांच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या रुग्णाला येथे बरा करण्यासाठी आणले आहे. मात्र, येथील घाणीमुळे अन्य आजार जडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
>वॉर्डमध्ये दुर्गंधी
रुग्णालयातील स्वच्छतागृहांचीही पुरती वाट लागलेली असल्याने तेथील साफसफाई नियमित होते का? असाच प्रश्न पडत आहे. पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील वॉर्डमध्येही दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आल्या आहेत.
तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याची ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही अस्वच्छता असल्याचे दिसून येते. परिसरातील नाल्यावरील झाकण तुटलेली असल्याने अपघातीची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे डासांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना त्याचा अधिक त्रास होत आहे.
लाइटचे बोर्डही उघडे असल्याने शॉक लागण्याची शक्यता आहे. रुग्णांना विविध योजनेची माहिती मिळावी, यासाठी उभारण्यात आलेले डिजिटल बोर्डही बंद अवस्थेमध्ये आहे. इमारतीचे जागोजागी प्लास्टर गळून पडले आहे.

Web Title: Dirt empire in a district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.