शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ई-पास मिळत नसल्याने अडचण, अ‍ॅप हाताळताना अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:18 IST

या सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दळणवळणासाठी ई-पास आवश्यक आहे.

रोहा : कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा तसेच काही दुकानांना केंद्र व राज्य शासनाने सवलत दिली आहे. या सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दळणवळणासाठी ई-पास आवश्यक आहे. मात्र, जिल्हा व तहसील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अ‍ॅपच्या साहाय्याने ई-पास निघत नसल्याने ई-पासचे घोडे अडलेलेच असून हे ई-पास मिळता मिळेनात, अशी परिस्थिती आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी, तसेच शेतीविषयक सेवा पुरवठादार, शासकीय कामे करणारे ठेकेदार मात्र हवालदिल झाले आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने ई-पास काढण्यासाठी एक लिंक तहसील कार्यालयांना कळविण्यात आली आहे. ई-पास काढण्यासाठी नागरिकांना या लिंकच्या माध्यमातून अर्ज करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यासाठी खास करून तयार करण्यात आलेले अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलमध्ये चालेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे अ‍ॅप विशिष्ट अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलमध्येच उघडत असल्याने याचा लाभ अनेकांना घेता येत नाही. त्यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज मान्य होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. याशिवाय ई-पास प्रोसेसिंग सिस्टीम रायगड या नावाचेही एक अ‍ॅप जिल्हा प्रशासनाने तयार केले आहे. या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पाससाठी अर्ज करावेत, अशा सूचना तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आल्या आहेत. मात्र, हे अ‍ॅपही कार्यान्वित नाही. रायगडात अत्यावश्यक सेवा ई-पासचे घोडे अडलेले असल्याचे चित्र आहे.>प्रक्रियेत सुलभता आणण्याची मागणीअ‍ॅपच्या माध्यमातून अर्ज करताना भरावयाची माहिती तसेच स्वत:चा फोटो, ओळखपत्र, कामाच्या ठिकाणचे ओळखपत्र अपलोड करणे शक्य होत नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे. इतर व्यक्तीच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाउनलोड झाले तर ती व्यक्ती अन्य व्यक्तींचे अर्ज अपलोड करू शकते अथवा नाही, याची शहानिशा होत नाही. सायबर कॅफे तसेच सीएससी सेंटर बंद आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा पास वितरणामध्ये सुलभता आणावी, अशी मागणी होत आहे. रोहा तहसीलदार कार्यालयातून ई-पाससाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सांगण्यात येत आहे. मात्र, अलिबाग कार्यालयातून पास आॅनलाइन अर्ज न करता उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस