शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दुष्काळसदृश तीन तालुक्यांत सवलती लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:59 IST

राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन या तीन तालुक्यांचा समावेश आहे.

- जयंत धुळप अलिबाग : राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने उपाययोजना व सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पाहणी निकषांनंतर लागू झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, श्रीवर्धन या तीन तालुक्यांत शासनाने २३ आॅक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.तीन तालुक्यांत जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे, या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी तीनही तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले असल्याचे सांगितले.‘लोकमत’ने सातत्याने रायगड जिल्ह्यातील शेती नुकसान व दुष्काळी परिस्थितीबाबत पाठपुरावा केल्यामुळेच या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळू शकला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRaigadरायगड