शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

उरण : रेल्वे स्थानकाच्या नाव बदलण्यासाठी धुतुम ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:23 IST

मागील २५ वर्षांपासून रेल्वे स्थानकाला धुतुम नाव देण्याची मागणी आहे.

मधुकर ठाकूरमागील २५ वर्षांपासून रेल्वे स्थानकाला धुतुम नाव देण्याची मागणी असताना मात्र सिडको, रेल्वे प्रशासनाने राजणपाडा नाव दिले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (२३) शंभर टक्के धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी रेल्वे स्थानकावरच मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. याआधीच बोकडवीरा, नवघर ग्रामस्थांनी स्थानकांची नावे बदलण्यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. त्यामध्ये नव्याने धुतुम ग्रामस्थांची भर पडल्याने सिडको, रेल्वे प्रशासनाची डोकेदुखीत आणखीनच वाढली आहे.  शंभर टक्के धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्थानिकाला धुतुम रेल्वे स्थानक असे नाव देण्याची मागणी तत्कालीन कॉंग्रेसचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी केली होती. याबाबत सिडको, रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारही सुरू होता. मात्र २५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर मात्र सिडको, रेल्वे प्रशासनाने धुतुम ऐवजी रांजणपाडा देऊन ग्रामस्थांचा रोष ओढवून घेतला आहे. रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला असतानाच मात्र धुतुम ग्रामस्थांनी नाव बदलण्यासाठी संघर्षांची भुमिका घेतली आहे. धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुतूम ग्रामपंचायत कार्यालयात नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे स्थानकाला रांजणपाडा ऐवजी धुतूम रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे, रेल्वे स्थानकात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च रोजी  मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला होता.

ग्रामस्थांच्या निर्धारानंतर गुरुवारी (२३) सरपंच सुचिता  ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रांजणपाडा ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता.घोषणाबाजी करीत  काढण्यात आलेल्या मोर्चात उपसरपंच कविता ठाकूर,माजी सरपंच अमुत ठाकूर,माजी सरपंच शंकर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर,प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर,रविनाथ ठाकूर, सुचिता कडू,स्मिता ठाकूर,अनिता ठाकूर,कमळाकर पाटील,माजी उपसरपंच शरद ठाकूर, गाव अध्यक्ष शंकर ठाकूर, रामनाथ ठाकूर,कुष्णा ठाकूर,शंकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कडू,अरुण ठाकूर, उद्योगपती नारायण ठाकूर, माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, ग्रामसेवक विलास म्हात्रे आदींसह  शेकडो ग्रामस्थ काळे कपडे ऊ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वक्त्यांनी स्थानकाला रांजणपाडा ऐवजी धुतुम रेल्वे स्थानक नाव बदलल्या शिवाय माघार घेतली जाणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :uran-acउरणrailwayरेल्वे