शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:33 IST

धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अलिबाग - धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सरकारच्या आडमुठे धोरणाविरोधात घोषणा देत, धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. सोमवारी अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाज धडकला. सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.सोमवारी सकाळी ११ वाजता अलिबाग शहरातील जिल्हा परिषद येथून मोर्चाला सुरु वात झाली. या वेळी नामदेव कटरे, महादेव खरात, मधुकर ढेबे, संजय कचरे, नामदेव कटरे, महादेव खरात, मधुकर ढेबे, संजय कचरे आदी उपस्थित होते. धनगर समाजाला देशाच्या सर्वोच्च अशा घटनेचे आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्य परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमाती (एसटी)च्या यादीमध्ये अनुक्र मांक ३६ नुसार केला आहे. त्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षणाच्या सोयी व सवलती मिळणे आवश्यक आहे. मात्र, अजूनपर्यंत सरकारने या बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे धनगर समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे.धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती देण्याविषयी केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; परंतु सत्तेवर येऊन चार वर्षे होऊनही धनगर समाज आरक्षणाच्या सवलतीपासून दूरच राहिला आहे. मोदी व देवेंद्र सरकार धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त धनगर समाजामध्ये असंतोष खदखदत असल्याचे आंदोलकांच्या भूमिकेवरून दिसून येते.

टॅग्स :reservationआरक्षणnewsबातम्या