शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

देसाई यांच्या मुलींनी दिला पित्याला खांदा; एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:08 IST

देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अलिबाग : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या इच्छेनुसार एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारास मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी रायगड पोलिसांनी मानवंदना दिली. नितीन देसाई यांच्या मुली मानसी आणि तन्वी यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला तर मुलगा कांत याने अग्नी दिला. 

देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अभिनेता आमिर खान, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, मधुर भांडारकर, आशुतोष गोवारीकर व रवी जाधव, अभिनेता सुबोध भावे व आदेश बांदेकर, खा. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, लालबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी, खा. उदयनराजे भोसले, शाहीर नंदेश उमप, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह सिनेकलावंत उपस्थित होते. 

तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जे. जे. रुग्णालयात देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

इर्शाळगडाची दुर्घटना घडली, त्यावेळी नितीन देसाईंची मदत सर्वात आधी पोहोचली होती. रात्री दीडच्या सुमारास गड चढत असताना आम्ही देसाई यांच्याशी संपर्क साधून टेंटची व्यवस्था होईल का, असे विचारले असता, त्यांनी तातडीने केवळ अर्ध्या तासात टेंट उपलब्ध करून दिले.- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड 

टॅग्स :Nitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाईMarathi Songsमराठी गाणी