शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

फडणवीस धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री - कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा घणाघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2024 16:51 IST

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मधुकर ठाकूर, उरण : मान -अपमानाची जोखड बाजूला सारून आणि एक दिलाने काम करुन महाविकास आघाडीचे मावळ उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व रायगड लोकसभा मतदारसंघातील अनंत गीते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर जिल्ह्यातील पक्षाच्या विविध  विभागांचे कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.जागा वाटपावरून काही ठिकाणी पक्षात नाराजी असली तरीही देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवून ते टिकवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी कॉग्रेस महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी एकदिलाने काम करीत आहे.मावळ, रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व अनंत गीते यांच्या विजयासाठी कॉग्रेसचे पदाधिकारी निवडणूकीत कामाला लागले असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका वेगळी असणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महेंद्र घरत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री अशी खोचक टीका केली.

नारायण राणे यांना अद्यापही उमेदवारीसाठी झटावे लागत आहे.तर विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सरकारमध्ये सामील होणार की, जेलमध्ये जाणार अशी धमकी मिळताच ते निमूटपणे सरकारमध्ये सामील झाले असल्याची टीकाही महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केली.निवडणूकांचे निकाल जाहीर होताच ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय यांच्या चौकशीच्या भीतीने भाजपात दाखल झालेले विविध राजकीय पक्षांचे बहुतांश नेते, पुढारी पुन्हा माघारी पक्षात सामील होतील अशी भविष्यवाणीही घरत यांनी केली.

ना खाऊंगा , ना खाने दूंगा नारा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ आहे.भडकती महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी , कामगार आदींच्या प्रश्नांवर केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. केंद्र सरकारच्या या हिटलरशाही व मनमानी कारभाराला आता जनता पार कंटाळली आहे.त्यामुळे देशभरात मोदी विरोधात लाट उसळली आहे.त्याचा सर्वाधिक फायदा विरोधकांनाच होणार असल्याने केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार स्थापन होईल असा दावा करतानाच हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीला उलथून टाकण्याचे आवाहन  कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे , काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, काँग्रेसच्या रायगड महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर , महिला तालुका अध्यक्षा रेखा घरत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raigadरायगड