शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:04 IST

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई : तीन महिन्यांत ७६ केसेसमधून १,७४,८00 रुपये दंड वसूल

सिकंदर अनवारे 

दासगाव : कोणतेही छोटे किंवा मोठे वाहन असो त्याचा विमा असणे गरजेचे आहे. अपघातानंतर विम्यामुळे वाहनांची भरपाई व जखमी किंवा मृत्यू अशा सर्वांना याचा लाभ मिळतो. आज शेकडो वाहने विनाविमा काढत फिरत असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्या तपासणी कारवाई दरम्यान उघडकीस आले आहे.

नवीन वाहन असो, अगर जुने त्याच्या किमतीप्रमाणे त्याचा विमा काढला जातो. मात्र, वाहतुकीच्या नियमानुसार विमा असणे गजरेचे आहे. नसेल तर वाहतूक नियमांचे उल्लंघन असून कारवाईस पात्र ठरतो. कोणत्याही वेळी कोणत्याही वाहनाचे काही घडू शकते. कोणत्याही वाहनाचा अपघात होत असेल तर त्यानंतर विम्याचा फायदा वाहनमालक व अपघातामध्ये जखमी किंवा मृत्यू असलेल्या कुटुंबाला होतो. संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी केली जात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र, नवीन कायद्याची अंमलबजावणी अद्याप महाराष्ट्रात झालेली नाही. आजही जुन्या कायद्याप्रमाणेच दंड वसूल केले जात आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत आठ महामार्ग वाहतूक पोलीस शाखा उभारण्यात आल्या आहेत. सध्या या शाखांवर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये वाहनांना बसवण्यात आलेल्या काळ्या काचा, सीटबेल्ट न घालणे, वाहनांचा विमा न काढणे, पीयूसी नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रेस अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्येक दिवशी या पोलीस शाखांमध्ये कारवाई केली जात असून, लाखो रुपये वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. एवढे होत असताना वाहनचालकांमध्ये आजही काही सुधारणा होत असल्याचे दिसून येत नाही. काही वाहनचालक वाहन कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. सध्या महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाई दरम्यान गेल्या तीन महिन्यांच्या वाहनांच्या तपासणीमध्ये ७६ वाहन विनाविमा सापडली. यांच्याकडून प्रत्येकी २३०० रुपयांप्रमाणे १,७४,८०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे.कोणत्याही वाहनाचा विमा हा महत्त्वाचा आहे. अपघातानंतर वाहनाचे होणारे नुकसान व जखमी व मृत व्यक्तीस लाभ देण्यास विमा कंपनीच जबाबदार राहते. अगर वाहनाचा विमा नसेल तर अपघातग्रस्त वाहनमालकाला मृत्यू अगर जखमी व्यक्तीस कोर्ट ठरवून देईल तेवढी रक्कम अदा करावी लागते. यामध्ये जर अपघात करणाºया वाहनमालकाची ऐपत नसेल तर मात्र मृत्यू किंवा जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयास मदत मिळत नाही, त्यामुळे कायद्याने वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे. 

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस