शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आंबा पिकांच्या विम्याचा प्रिमियर भार कमी करण्याच्या मागणीला केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 22:11 IST

राज्यातील आंबा बागायतदार व शेतकऱ्यांसाठी शासनाने आंबा पिकासाठी पूनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केलेली आहे.

मधुकर ठाकूर -

उरण :आंबा पीक विम्यासाठी सम हवामान असतानाही कोकणातील विविध जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. प्रीमियरची ही विषमता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार पटीने अधिक व अवास्तव असल्याने कमी व्हावी, अशी मागणी उरणच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.राज्यातील आंबा बागायतदार व शेतकऱ्यांसाठी शासनाने आंबा पिकासाठी पूनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केलेली आहे. यासाठी रायगड जिल्ह्याकरिता ॲग्री कल्चर इन्शूरन्स विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. याअंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. 

दरम्यान केंद्र व राज्य शासनाचा सहभाग असलेली आंबा पिकांसाठी फळपीक विमायोजना लागू करण्यात आली असताना सम हवामान असलेल्या कोकणातच ही विषमता दिसून येते. यात शासनाने जे निकष लावले आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एका झाडासाठी १३३ रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी एका झाडासाठी १६७ रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी एका झाडासाठी २३४ रुपये आणि रायगड जिल्ह्यासाठी एका झाडासाठी २९४ रुपये अशी तफावत यामध्ये दिसून येत आहे. 

  मात्र रायगडच्या आंबा बागायतदारांवर हा अन्याय का? असा सवाल आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केला आहे. २०१९-२०-२१ या  सालापर्यंत रायगड जिल्ह्यासाठी एका झाडासाठी प्रीमियम रुपये ७० होता. म्हणजे हेक्टरी रुपये ७००० होता. २०२१-२२ सालापासून तो एकदम चार पट वाढविण्यात आला. म्हणजे एका झाडाला रुपये २९४ तर  हेक्टरी रुपये  २९ हजार ४०० रुपये करण्यात आलेला आहे. पूर्वी कोकणासाठी एकच दर होता. कारण रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याचे हवामान जवळपास सारखेच आहे. 

मागील वर्षापासून रायगड जिल्ह्यासाठी चारपट  प्रीमियम करण्यात आला आहे. हा अवास्तव असल्यामुळे तो कमी व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे मागील वर्षी  शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त कृषी पुणे यांना तो कमी करण्याबाबत लेखी निवेदन दिले होते. या अनुषंगाने कृषी आयुक्त पुणे यांच्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक देखील झाली. मात्र प्रीमियम कमी करण्यात यश आले नाही. त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्र्यांचीही कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, चिरनेर सरपंच संतोष चिर्लेकर, आंबा बागायतदार भास्कर ठाकूर, कृष्णा केणी व अन्य शेतकऱ्यांनी  प्रत्यक्ष भेटून, लेखी निवेदनाद्वारे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र प्रीमियम कमी झाला नसल्याची खंतही संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.हा प्रकार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात घडला असता तर राज्यकर्त्यांनी यावर निश्चितपणे तोडगा काढला असता अशी संतप्त प्रतिक्रियाही संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रीमियरची ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उरण कृषी अधिकारी विश्वनाथ धवल यांनी दिली. 

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार